खंडग्रास ग्रहणाची उद्या पर्वणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

भारतातून बुधवारी (ता.१७) पहाटे दीड वाजता खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार एक वाजून ३१ मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहण सुरू होईल. संपूर्ण देशात सुरवातीपासून शेवटपर्यंत हे ग्रहण दिसेल. केवळ अरुणाचल प्रदेशच्या अत्यंत दूरवरच्या ईशान्येकडच्या भागात ग्रहण सुटतानाची स्थिती दिसू शकणार नाही, असे भूविज्ञान मंत्रालयाने कळविले आहे.

पुणे - भारतातून बुधवारी (ता.१७) पहाटे दीड वाजता खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार एक वाजून ३१ मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहण सुरू होईल. संपूर्ण देशात सुरवातीपासून शेवटपर्यंत हे ग्रहण दिसेल. केवळ अरुणाचल प्रदेशच्या अत्यंत दूरवरच्या ईशान्येकडच्या भागात ग्रहण सुटतानाची स्थिती दिसू शकणार नाही, असे भूविज्ञान मंत्रालयाने कळविले आहे.

पृथ्वीच्या छायेने चंद्र हळूहळू झाकला जाण्यास सुरवात होईल. खंडग्रास चंद्रग्रहणाचा परमोच्च बिंदू ३ वाजून १ मिनिटाने असेल. याक्षणी चंद्राचा अर्ध्याहून अधिक भाग पृथ्वीच्या छायेने झाकलेला असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार ४ वाजून ३० मिनिटांनी हे ग्रहण सुटेल. ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, ईशान्य आशिया वगळता आशियाचा इतर भाग, उत्तर स्कॅंडेव्हिया वगळता युरोप आणि दक्षिण अमेरिकेच्या बहुतांश भागात ग्रहण दिसेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khandagras eclipse