खानदेशी भरिताची विश्‍वविक्रमी भरारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

जळगाव - खानदेशातील हिवाळ्यामधील प्रसिद्ध मेनू असलेले भरीत आज विशेष ठरले. येथील सागर पार्क मैदानावर सकाळपासून या भरीताच्या निर्मितीला सुरवात झाला होती. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सहा तासांत अडीच हजार किलो वांग्यांचे भरीत तयार केले. 

जळगाव - खानदेशातील हिवाळ्यामधील प्रसिद्ध मेनू असलेले भरीत आज विशेष ठरले. येथील सागर पार्क मैदानावर सकाळपासून या भरीताच्या निर्मितीला सुरवात झाला होती. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सहा तासांत अडीच हजार किलो वांग्यांचे भरीत तयार केले. 

या भरीताचा विश्‍वविक्रम झाला असून, याची नोंद गिनेस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.  हे भरीत करण्यासाठीची प्रक्रिया पहाटे सुरू झाली होती. विश्‍वविक्रमी भरीत जळगावात तयार होणार असल्याने हे पाहण्याची संधी जळगावकरांनी सोडली नाही. अनेकांनी महाकाय कढईत भरीत बनविण्याचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतला. तर बहुतांश जण विष्णू मनोहर यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी करत होते. यानंतर अनेकांनी या भरीतावर तावही मारला.

गिनेस बुकमध्ये नोंद 
जळगावातील सागर पार्क मैदानावर तयार करण्यात आलेल्या अडीच हजार किलो वांग्यांचे भरीत हे विश्‍वविक्रमी ठरले. या विश्‍वविक्रमाची नोंद गिनेस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली. रेकॉर्डचे नागपूर येथील अधिकारी गौरव द्विवेदी, मिलिंद देशकर, विजय जथे यांच्या पथकाने विष्णू मनोहर यांना त्यासंबंधीचे प्रमाणपत्र दिले.

हे साहित्य वापरले
    वांगे - ३२०० किलो 
    शेंगदाणा तेल - १२० किलो 
    हिरवी मिरची - १०० किलो 
    लसूण - ५० किलो 
    शेंगदाणे - २० किलो 
    जिरे - ५ किलो 
    कोथिंबीर - १०० किलो 
    टीममधील सेवक - १२५ 
    कढई  - १० फूट व्यास

Web Title: Khandeshi Bharit World Record Vishnu Manohar