अतिपावसाचा खरिपाला फटका

Rain
Rain

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात नुकसान; तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज
पुणे - दीर्घ खंडानंतर बुधवार (ता. १५) ते शुक्रवारपर्यंत (ता. १७) विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाने दणका दिला. यात नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील रंगावली नदीने रौद्ररूप धारण केल्याने जीवित आणि वित्तहानी झाली. तर विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीमसह यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तर मराठवाड्यात पाण्याअभावी खरीप धोक्यात आला असतानाच जोरदार पावसामुळे पिकांचे अातोनात नुकसान झाले आहे. 

आज (ता. १९) कोकण, विदर्भात पाऊस वाढणार असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने विर्तविली आहे.

नवापूर, (जि. नंदुरबार) तालुक्‍यात शुक्रवारी (ता. १७) पहाटे झालेल्या अतिवृष्टीने तीन महिला व दोन पुरुषांचा बळी घेतला; तर ५७ जनावरेही या पावसात मृत्युमुखी पडली. तसेच नवापूर, विसरवाडी, बोकळझर, चौकी या भागांतील ४१९ घरांचे नुकसान झाले. रंगावली नदीला पूर अाल्यानंतर पहाटेची वेळ असल्याने रौद्ररूप लवकर लक्षात न आल्याने जीवित व वित्तहानी वाढली. 

वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यात गुरुवारी (ता.१६) झालेल्या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहिले. पुराच्या पाण्यामुळे काठावरील शेतातील पिकांचे नुकसान झाले. यवतमाळ जिल्ह्याच्या अनेक तालुक्‍यांत झालेल्या अतिवृष्टीने २२ हजार हेक्‍टरवरील पिकांना फटका बसला असून, तब्बल चार हजार घरांची पडझड झाली. महसूल विभागाने या नुकसानीच्या पंचनामाचे आदेश दिले अाहेत. 

जुन्नर (जि. पुणे) तालुक्याच्या ऐतिहासिक दाऱ्या घाटाच्या पायथ्याशी असलेल्या आंबोली येथे गुरुवारी (ता. १६) झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या भात खाचरात ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह घुसल्याने भातरोपे व माती वाहून गेली आहे.

शुक्रवारी जोर ओसरलेल्या पावसाने शनिवारीही राज्यात उघडीप दिली होती. शनिवारी (ता. १८) सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. 

अनेक ठिकाणी फटका
    नवापूर तालुक्‍यात पाच जणांसह ५७ जनावरांचा मृत्यू
    वऱ्हाडात शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान
    यवतमाळमध्ये २२ हजार हेक्‍टरला फटका
    अनेक भागांत नद्यांची पूरस्थिती कायम
    गडचिरोली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com