यंदा राज्यात धनधान्यांची बरकत राहील

Agriculture
Agriculture

पुणे - कोविड १९ च्या महासंकटावर मात करीत बळीराजाने केलेल्या कष्टाळू नियोजनाला वरूणराजाची चांगली साथ मिळत असल्याने यंदाचा खरीप दणकेबाज ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा राज्यात धनधान्यांची बरकत राहील, असा आशादायक सूर कृषी क्षेत्रातून व्यक्त होतो आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘राज्यात यंदा आतापर्यंतची खरीप पिकांची स्थिती अतिशय आशादायक आहे. हंगाम चांगला झाल्यास बाजार समित्यांमध्ये दरवर्षी होणारी अंदाजे ४५ ते ५० हजार कोटी रुपयांची उलाढाल या खरीपामध्ये ५५ हजार कोटींच्या पुढे पोहचू शकते. तथापि, काढणीपर्यंत निसर्गाने साथ देणे अपेक्षित आहे,’असे मत पणन विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केले.

राज्यात ऑगस्टच्या मध्यापर्यंत २२७ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. ९४ तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांच्या पुढे, तर २८ तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांच्या पुढे पाऊस आहे. म्हणजेच ३५५ पैकी ३४९ तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस असल्याने पिकांची स्थिती चांगली आहे. 
शेतकऱ्यांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत सरासरी १४१ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पिके घेतली आहेत.

२०२० च्या खरिपात २४ ऑगस्टपर्यंत पेरा १४० लाख हेक्टरच्या पुढे गेल्याचे दिसून येते. मागील हंगामात याच कालावधीपर्यंत पेरा अवघा १३५ लाख हेक्टर होता. म्हणजेच यंदा पाच लाख हेक्टरचा पेरा लवकर झाल्याचे स्पष्ट होते.

राज्यभर आतापर्यंतचा मॉन्सून आणि पिकपेरा उत्साह वाढविणारा आहे. कोविड संकटातही शेतकऱ्यांनी केलेले नियोजन कौतुकास्पद आहे. पुढे पावसाचा एकदम खंड किंवा अतिपाऊस न झाल्यास यंदाचे उत्पादन भरघोस राहील. 
- उमेशचंद्र सरंगी, कृषी अर्थतज्ज्ञ व माजी अध्यक्ष, नाबार्ड

विदर्भासह मराठवाड्यात समाधानकारक पाऊस आहे. बहुतांश पिकांची अवस्था चांगली आहे. कोविड १९ चे सावट असतानाही शेतकऱ्यांनी खरीप नियोजनाच कमतरता येऊ दिलेली नाही. त्यामुळे सध्या विक्रमी अन्नधान्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 
- डॉ.अशोक ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com