महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

श्रीगोंदे (नगर) : शहरातील एका महाविद्यालयात बारावीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे आज सकाळी दहाच्या सुमारास अपहरण करण्यात आले. संबंधित मुलगी महाविद्यालयाजवळ शिकवणीला जात असताना बळजबरीने तिला मोटारीत ओढून पळवून नेले.

अपहृत मुलीच्या वडिलांनी श्रीगोंदे पोलिसात फिर्याद दाखल केली. याबाबतची माहिती अशी ः संबंधित मुलगी चुलत बहिणीबरोबर महाविद्यालयाच्या रस्त्याने जात होती. महाविद्यालयाजवळील एका हॉटेलसमोर, पाठीमागून आलेल्या स्कॉर्पिओ मोटारीतील दोघांनी तिच्याजवळ वाहन थांबवून तिला बळजबरीने आत ओढले.

यापूर्वी गावातच राहणाऱ्या एका मुलाने विनयभंग केल्याची तक्रार तिने दिली होती. या गोष्टीचा राग धरून त्याच मुलाने मित्रांच्या मदतीने तिला पळवून नेल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, लवकरच आरोपींना ताब्यात घेऊन मुलीची सुटका करू, असा विश्वास व्यक्त केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kidnapped of a college student