esakal | सोमय्या वि. प्रशासन | मानव अधिकार आयोगाकडून तक्रारीची दखल
sakal

बोलून बातमी शोधा

kirit somaiya

सोमय्या Vs प्रशासन | मानव अधिकार आयोगाकडून तक्रारीची दखल

sakal_logo
By
ओमकार वाबळे

भाजपचे नेते किरीट सोमय्या दिवसेंदवस नवनवीन मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. यामध्ये आता पोलीस अधिकारी विश्वास नांगरे यांचाही समावेश झाला आहे. नांगरे हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया असल्याची टीका त्यांनी केली. यानंतर सोमय्यांनी मुंबई आणि कोल्हापूर पोलीस तसेच कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेतल्याची माहिती सोमय्यांनी ट्विटरवर शेअर केली.

किरीट सोमय्या यांना मुलूंडच्या घरातून बाहेर पडण्यास मुंबई पोलिसांनी मज्जाव केला होता. यानंतर कोल्हापूर प्रशासनाने देखील त्यांच्यावर कारवाई करत अटक केली. यानंतर सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. अखेर सोमय्यांनी मी दिल्लीत गृहमंत्री राज्य मंत्री अजय मिश्रा यांची भेट घेतली. याबद्दल त्यांनी ट्वीट केलं.

काय म्हणाले सोमय्या ?

मिश्रा यांनी माझ्या बेकायदेशीर अटकेबाबत महाराष्ट्र सरकारकडून तपशील मागवण्याचे आश्वासन दिले आहेत. कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मला झेड सिक्युरीटी असल्याने हे षडयंत्र यशस्वी झालं नाही. हे पूर्वनियोजित होतं. याचा उल्लेख मी मिश्रा यांच्यासमोर केला, असे सोमय्या म्हणाले.

loading image
go to top