Uddhav Thackeray: ठाकरे कुटुंबियांच्या अडचणी वाढ? ती १९ बंगल्यांची गायब झालेली फाईल सापडली

ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने १९ बंगले अधिकृतपणे बांधण्यात आले होते. पण...
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण कोर्लई गावातील १९ बंगल्यांची गायब झालेली फाईल सापडल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. (Kirit Somaiya big claim On uddhav thackeray family maharashtra politics )

रायगडच्या कोर्लई गावातील १९ बंगल्यांच्या घोटाळ्या प्रकरणाची फाईल मिळाली आहे. त्यामुळे लवकरच आपण याबाबत मोठा गौप्यस्फोट करणार, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray
Barsu Refinery Project : जी स्थानिकांची तीच माझी भूमिका; रिफायनरी प्रकल्प लादू देणार नाही; उद्धव ठाकरे

रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने १९ बंगले अधिकृतपणे बांधण्यात आले होते. पण, आरोप करण्यात आल्यानंतर हे १९ बंगले जमीनदोस्त आले, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यापूर्वी केला आहे.

Uddhav Thackeray
अभिमानास्पद! मॉरेशियसमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण; फडणवीस राहणार उपस्थित

किरीट सोमय्या यांनी याबाबत तक्रार सुद्धा दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आतापर्यंत ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी रेवदंडा पोलिसांनी कोर्लई गावातील माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com