
किरीट सोमय्यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर आमदारकीचा राजीनामा देईन, अशी प्रतिक्रिया आमदार मुश्रीफांनी दोन दिवसांपूर्वी दिली आहे.
NCP चा 'हा' बडा नेता अडकणार ED च्या जाळ्यात? सोमय्यांनी Video शेअर करुन दिली महत्वाची अपडेट
Hasan Mushrif News : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचार प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत.
यातच ईडीनं मुश्रीफांच्या घरी छापेमारी करुन तपासणी केली. यानंतर काही दिवसांतच मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेतही ईडीनं (ED) छापा टाकत काही अधिकाऱ्यांना ताब्यात घेवून तपासणीनंतर सोडून दिलं.
दरम्यान, सोमय्यांनी मुश्रीफांवर बँकेतून 40 कोटींचे कर्ज दिल्याचा आरोप केला. त्यानंतर आज (शनिवारी) पुन्हा किरीट सोमय्यांनी मुश्रीफांवर गंभीर आरोप केलाय. हसन मुश्रीफांनी आणखी एक घोटाळा केल्याचं त्यांनी सांगितलंय.
सोमय्यांनी एक टि्वट करीत हे आरोप केले आहेत. मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गैरव्यवहार केला आहे. मुश्रीफ यांनी त्यांच्या मालकीच्या ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनी (Brisk Facilities Company) या बॅंकेच्या माध्यमातून १५६ कोटी रुपयांचे कर्ज दिले, थकीत कर्जात एनपीए करुन हा गैरव्यवहार अॅडजस्ट केला आहे. मुश्रीफ यांनी बँक प्रशासनाच्या संगनमतानं हा गैरव्यवहार केल्याचं सोमय्यांनी म्हटलंय.
सोमय्यांनी यापूर्वी मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. याला हसन मुश्रीफांनी प्रत्त्युत्तर दिलंय. किरीट सोमय्यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर आमदारकीचा राजीनामा देईन, अशी प्रतिक्रिया आमदार मुश्रीफांनी दोन दिवसांपूर्वी दिली आहे. त्यातच आज सोमय्यांनी पुन्हा मुश्रीफांवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना मुश्रीफ काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.