तारीख ठरली, वेळ ही ठरली! किरीट सोमय्या कोल्हापुरात पुन्हा येणार

kirit somaya
kirit somayaesakal

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराबाबत मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. किरीट सोमय्या मंगळवारी (ता. २८) कोल्हापुरात येणार आहेत. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना पाठवले आहे.

दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात सोमय्या यांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. पण त्यानंतरही सोमय्या रेल्वेने कऱ्हाडपर्यंत आले होते. तिथे पोलिसांनी त्यांना अडवले. आणि ते मुंबईला गेले. मात्र आज त्यांनी पुन्हा कोल्हापूरला मंगळवारी येणार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

दरम्यान, कोल्हापूरची शांतता बिघडू नये, राजर्षि छत्रपती शाहूमहाराजांच्या जनतेला चिथावणीखोर भाषा वापरुन कीरीट सोमय्या यांनी डिवचण्याचा प्रयत्न करु नये. निवडणूकीपुरते १५ दिवस राजकारण करुन बाकी पूर्ण वेळ पक्षभेद व जातीपातीच्या पलीकडे जाऊन अहोरात्र सामाजिक काम करणाऱ्या हसन मुश्रीफांवर आरोप करुन आपले स्वत:चे राजकीय अस्तित्व निर्माण करुन जनतेला भडकविण्याचे प्रयत्न सोमय्यांनी करू नये असे आवाहन नागरी कृती समितीने केले आहे.

kirit somaya
राऊतांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी; चंद्रकांत पाटलांचा चिमटा

सोमय्या यांच्यावर कारवाई करा ः कदम
माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अनिल कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे पत्रकाद्वारे केली. पत्रकातील माहितीनुसार, कायदा आणि शासन नियमांपेक्षा कोणीही मोठा नाही. आमदार, खासदार कोणीही असो. प्रत्येकाने कायदा आणि शासन नियमांचे पालन केलेच पाहिजे; पण माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कायदा, शासन नियमांचे उल्लंघन केल्याचे वृत्तवाहिनीतील बातमीपत्रावरून दिसून येते. सामान्य जनतेसाठी कायदा व नियम आहेत; मात्र सोमय्या यांना माफ आहे का, अशी शंका निर्माण झाली आहे. यासाठी सोमय्या यांच्यावर कायदेशीर गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी करत आहोत.

पत्रात सोमय्या यांनी म्हटले आहे, मी २० सप्टेंबरला कोल्हापुरात येणार होतो. माझ्या दौऱ्यावर आपण प्रतिबंध लावला आणि जिल्हा बंदीचे आदेश दिले. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळा, गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना घोटाळा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ परिवार आर्थिक घोटाळा यासंदर्भात कोल्हापुरात येणार आहे.

मला स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार आणि पुरावे द्यायचे आहेत. यापूर्वी मी येणार होतो; मात्र त्यावेळी पोलिस गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तात व्यस्त होते. त्यामुळे बंदी आदेश काढला होता. आता मी सोमवारी (ता. २७) निघून मंगळवारी (ता. २८) कोल्हापुरात येणार आहे. पूर्वी ठरवलेले कार्यक्रम करणार आहे. सकाळी ९ वाजता अंबाबाईचे दर्शन घेणार आहे. त्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्याची विनंती पत्रकात केली आहे.

असा आहे सोमय्या यांचा दौरा

स. ७.३० रेल्वे स्टेशनवर आगमन

८.०० शासकीय विश्रामगृहावर राखीव

९.०० अंबाबाई मंदिर दर्शन

(सरचिटणीस मैत्राणी यांच्या घरी नाष्टा)

९.४५ भाजप कार्यालयात प्रदर्शनास भेट

१०.०० ते ११.३० कागलकडे प्रयाण (संताजी घोपडे कारखाना)

११.३० ते १२.०० संताजी घोरपडे कारखान्यास बाहेरून भेट

१२.०० ते १.०० मुरगूड पोलिस ठाण्यात तक्रार देणार

२.०० ते ३.०० भोजन (हॉटेल अयोध्या)

३.१५ ते ३.४५ पोलिस अधीक्षक भेट

४.०० ते ५.०० पत्रकार परिषद (हॉटेल अयोध्या)

५.१५ ते ५.४५ ग्रामीण पदाधिकारी बैठक

६.०० ते ६.१५ शहर पदाधिकारी बैठक

८.१५ रेल्वे स्टेशनकडे प्रयाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com