महाराष्ट्र "माफिया" मुक्त होत आहे, किरीट सोमय्यांचं ट्विट

Kirit Somaiya
Kirit Somaiya esakal

महाराष्ट्र "माफिया" मुक्त होत आहे, अशा शब्दात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया (Kirit Somaiya tweeted after the resignation of the Chief Minister Maharashtra Politics) दिली.

Kirit Somaiya
मविआ अखेर कोसळलं, वाचा उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ७ महत्त्वाचे मुद्दे

राज्यातील सत्तानाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा (Cm Uddhav Thackeray Resign) राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्द्वारे जनतेशी संवादादरम्यान हा मोठा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्यांनी 'महाराष्ट्र "माफिया" मुक्त होत आहे, आत्ता मुंबई महापालिका माफिया मुक्त करणार' असे ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आलं. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आहे. शिंदे गट काल रात्री गोव्यातील ताज कन्व्हेंन्शन सेन्टर या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. गोव्यातून हे बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आहे. या बंडखोरांच्या स्वागतासाठी भाजपनं जय्यत तयारी केली आहे.

Kirit Somaiya
ठाकरे सरकार कोसळताच बच्चू कडूंना रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट!

शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह केलेल्या बंडामुळं राज्यात गेले दहा 10 दिवस राजकीय नाट्य पाहायला मिळालं. राज्यातील राजकीय भूकंपाचं केंद्र सूरत ते गोवा व्हाया गुवाहाटी असं सरकत गेलं आणि उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानं या राजकीय नाट्यावर पडदा पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com