नाना पटोले यांचा राजीनामा; काँग्रेसमध्ये राजीनामास्त्र सुरुच 

Nana Patole
Nana Patole

भंडारा : अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ त्यांनी राजीनाम्याचे पाऊल उचलले आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदी न राहण्याची भूमिका घेतली. मात्र, राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये, अशी कॉंग्रेस नेत्यांची मागणी आहे. यासाठी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामास्त्र सुरू आहे.

लोकसभेतील पराभवाची जबाबदार घेत नाना पटोले यांनी अखिल भारतीय किसान कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसला आलेल्या अपयशाची जबाबदारी सामूहिक आहे. त्यामुळेच मी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. तसेच माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व संघटन बरखास्त करत आहे. तसेच, राहुल गांधींच्या समर्थनार्थ यापुढे काँग्रेसचा सैनिक म्हणून काम करत राहणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com