Long March : मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या लाँगमार्चला यश; आंदोलनकांच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kisan Long March government accepted all demands of farmers who took out the long march by eknath shinde govt

Long March : मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या लाँगमार्चला यश; आंदोलनकांच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य

Farmers Long March News : नाशिकहून मुंबईच्या दिशेने काढण्यात आलेल्या शेतकरी लाँग मार्चला अखेर यश आलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदेलनाला यश आले असून शेतकऱ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या शिंदे फडणवीस सरकारने मान्य केल्या आहेत. आमदार विनोद निकोले यांनी याबाबत माहिती दिली आहे.

उद्या मुख्यमंत्री निवेदन देणार

लाँग मार्च बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या शिष्ठमंडळाची भेट घेतली. या भेटीनंतर शेतकऱ्यांशी त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असल्याचे या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

तसेच शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत उद्या सभागृहात झालेल्या चर्चेवरक निवेदन देणार असल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. लाँग मार्च मागे घेण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले आहेत.

मोर्चा मागे कधी घेणार?

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत माहिती देताना शेतकरी नेत्यांनी सांगितलं की, सरकार सोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र मोर्चा लगेच मागे घेणार नाही. मोर्चा आहे तिथेच थांबवला जाईल.

उद्या विधिमंडळाच्या पटलावर मागण्याचे विषय घेऊन संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणीचे आदेश पारित झाल्यानंतर मोर्चाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मोर्चा आज मागे घेणार नाही, मात्र उद्या आदेश निर्गमित झाल्यानंतर मोर्चा मागे घेणार असल्याची माहिती शिष्टमंडळासोबत गेलेल्या नेत्यांची साम टीव्हीला दिली.