जाणून घ्या, तुमच्या जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट

कोल्हापूर डेंजर झोन मध्ये
Corona Patient
Corona PatientSakal

मुंबई: राज्य सरकार कडून जिल्ह्याचे पॉझिटिव्हिटी रेट (corona positivity rate) आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. गोंदियाचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वात कमी तर कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट हा राज्यात सर्वात अधिक आहे. राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी पाच स्तरावर आखणी करण्यात आली आहे. या आठवड्यातही कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्ये आहे. (Know about district wise corona positivity rate)

राज्यातला पॉझीटीव्हिटी रेट किती आहे यावर ही आखणी करण्यात आली आहे . शुक्रवारी राज्य सरकारने नव्याने आकडेवारी जाहीर केली आहे . यात कोल्हापूरचा  पॉझीटीव्हिटी रेट सर्वाधिक म्हणजेच 13.77% एवढा आहे.

Corona Patient
इंजिनिअरींगची नोकरी सोडून प्रियकरासोबत करत होती गांजाचा बिझनेस

त्याखालोखाल रायगड जिल्ह्यामध्ये 12.7 77% पॉझिटिव्हिटी रेट आहे. तर तिथेच कोल्हापूर मध्ये ऑक्सीजन बेड हे 54. 78 % भरले आहेत तर रायगडमध्ये त्यामानाने ऑक्सीजन बेड हे केवळ 14.6 टक्के एवढेच भरलेले आहेत

कोणत्या जिल्ह्यात किती पॉझीटीव्हिटी रेट 

अहमदनगर – 3.06

अकोला – 4.97

अमरावती – 1.67

औरंगाबाद – 2.94

बीड – 7.11

भंडारा – 0.96

बुलढाणा – 2.98

चंद्रपूर – 0.62

धुळे – 2.45

गडचिरोली – 3.53

गोंदिया – 0.27

हिंगोली – 1.93

जळगाव – 0.95

जालना – 1.51

कोल्हापूर -13.77

लातूर – 2.55

नागपूर – 1.25

नांदेड – 1.94

नंदुरबार – 3.13

नाशिक – 4.39

उस्मानाबाद – 5.21

पालघर – 5.19

परभणी – 0.94

पुणे -9.88

रायगड - 12.77

रत्नागिरी – 11.90

सांगली – 8.10

सातारा – 8.91

सिंधुदुर्ग – 9.06

सोलापूर – 3.73

ठाणे – 4.79

वर्धा – 1.12

वाशिम – 2.79

यवतमाळ – 3.79

Corona Patient
Lockdown Effect: मुंबईत फेरीवाला बनला ड्रग्ज तस्कर

पाच स्तरीय  किंवा टप्प्यांची आखणी  कश्या प्रकारे 

पहिला स्तर -  पॉझीटीव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी , तसेच जिल्ह्यात ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी भरलेले  असावेत .  

दुसरा स्तर - पॉझीटीव्हिटी रेट ५ टक्यांपेक्षा कमी , ऑक्सिजन बेड २५ ते ४० टक्क्यापेक्षा भरलेले . 

तिसरा स्तर -  पॉझीटीव्हिटी रेट ५ ते १० टक्यांपेक्षा कमी , तसेच ऑक्सिजन बेड ४० टक्यांपेक्षा जास्त  भरलेले . 

चौथा स्तर - पॉझीटीव्हिटी रेट १० ते २० टक्यांपेक्षा कमी , तसेच ऑक्सिजन बेड ६० टक्यांपेक्षा जास्त  भरलेले . 

पाचवा स्तर -  पॉझीटीव्हिटी रेट २० टक्यांपेक्षा जास्त , तसेच ऑक्सिजन बेड ७५  टक्यांपेक्षा जास्त  भरलेले .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com