
Woman Soldier: चिमूकल्याला सोडून देशसेवेसाठी निघालेल्या रणरागिनीचे मुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक
नंदगाव : मातृत्वापेक्षा देशसेवेला प्राधान्य देऊन दहा महिन्याच्या बाळाला पतीच्या हातात देऊन देशसेवेसाठी जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर व याची दैनिकांत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वर्षा व तिच्या कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वृत्तपत्रांची बातमी व सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा पाटील यांचे कौतुक केले.
मुख्यमंत्र्यांचे स्विय सहायक, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी आधिकारी मंगेश चिवटे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मुख्यमंत्र्यांनी वर्षा पाटील कौतुक केल्याचे सांगत त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्त वाचून व व्हिडीओ पाहून कर्तव्यदक्ष महिलेला भक्कम पाठिंबा देणाऱ्या कुटुंबीयांचे कौतुक करत कणखर आईचा व सर्वांचा अभिमान असल्याचा चिवटे यांचेमार्फत सांगितले.
वर्षा निवासस्थानी चहा-पाण्याचे निमंत्रणही दिले. हा संवाद सागर कांबळे, कांचनवाडी यांनी घडवून आणला. याप्रसंगी वर्षाचे पती रमेश, आई-वडील, भाऊ विनायक व परिवार उपस्थित होता.
‘सकाळ’कडून सर्वप्रथम दखल
८ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त वर्षा मगदूम-पाटील यांच्या देशसेवेचा प्रवास सर्वप्रथम दैनिक ‘सकाळ’ने प्रसिद्ध केला होता. याबद्दल वर्षा व तिच्या घरच्यांनी ‘सकाळ’चे आभार मानले.