esakal | देवाची गाडी सुरू करा; चंद्रकांत पाटलांचा थेट पियुष गोयल यांना मेल
sakal

बोलून बातमी शोधा

देवाची गाडी सुरू करा;  चंद्रकांत पाटलांचा थेट पियुष गोयल यांना मेल

देवाची गाडी सुरू करा; चंद्रकांत पाटलांचा थेट पियुष गोयल यांना मेल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर ते सोलापूर (kolhapur solapur)जाणाऱ्या अनेक गाड्या कोरोनामुळे वर्षाहून अधिक काळ बंद आहे. यामुळे तीर्थक्षेत्र पंढरपूरला(pandhrpur) जाऊन विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ​येणाऱ्या भाविकांची देवाची गाडी बंद झाली आहे. कोल्हापूर ते सोलापूर मार्गावर असणाऱ्या जिल्ह्याच्या उन्नतीच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या या गाड्या पुन्हा सुरु करण्याची मागणी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इमेल द्वारे ​केंद्रीय रेल्वे मंत्री​ पियुष गोयल यांच्याकडे केली. (kolhapur-solapur-start-to-railway-bus-demand-for-chandrakant-patil-mail-to-piyush-goyal-kolhapur-news)

या ईमेल मध्ये म्हंटले आहे कि, सध्या कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाली आहे यामुळे पुणे, मुंबई, गोंदिया, गोवा, दिल्ली या ठिकाणी गाड्या धावत आहेत त्याच पद्धतीने सोलापूर, पंढरपूरसारख्या आध्यात्मिक नगरीत गाड्या सुरू कराव्यात. त्याचबरोबर सोलापूर रेल्वे विभागाकडून मिरज - सोलापूर सुपरफास्ट एक्सप्रेस अल्प प्रवाशांचे कारण देत बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे याबाबत देखील आपण गांभीर्याने लक्ष द्यावे.

हेही वाचा- कोरोना आढाव्यानंतर उमुख्यमंत्र्यांची फटकेबाजी; चंद्रकांत पाटील, नाना पटोलेंच्या वक्‍तव्याचा समाचार

सोलापूर रेल्वे मार्गावर देवाची गाडी सुरु झाल्याने कोल्हापूर, सांगली आमि सोलापूर जिल्ह्यांचा संपर्क वाढणार असून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सुरू होणाऱ्या या गाडीमुळे स्थानिकांना रोजगारासाठी पुन्हा चालना मिळणार आहे. आपल्या प्रयत्नातून देवाची गाडी पुन्हा लवकर सुरु झाल्यास येणाऱ्या आषाढी एकादशीला भाविकांना श्री विठ्ठलाच्या प्रत्यक्ष दर्शानाने कोरोना संकट काळात आध्यात्मिक बळ प्राप्त होणार आहे.

loading image