कोपर्डीचा खून गोठलेल्या रक्ताने; आरोपींना फाशीच द्या : निकम; 29ला निकाल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

नगर : कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणातील तिन्ही आरोपींनी थंड डोक्‍याने नव्हे, तर गोठलेल्या रक्ताने पीडित मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला. त्यामुळे तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद ऍड. उज्ज्वल निकम यांनी केला. न्यायालयाने निकालासाठी 29 नोव्हेंबर तारीख ठेवली आहे.

नगर : कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणातील तिन्ही आरोपींनी थंड डोक्‍याने नव्हे, तर गोठलेल्या रक्ताने पीडित मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला. त्यामुळे तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद ऍड. उज्ज्वल निकम यांनी केला. न्यायालयाने निकालासाठी 29 नोव्हेंबर तारीख ठेवली आहे.

जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (वय 25, रा. कोपर्डी, ता. कर्जत), संतोष गोरख भवाळ (वय 30, मूळ रा. खांडवी, हल्ली कोपर्डी) व नितीन गोपीनाथ भैलुमे (वय 26, रा. कोपर्डी) असे दोषी ठरविलेल्या आरोपींची नावे आहे. या तिघांनाही न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर आज सरकारपक्ष व आरोपी क्रमांक दोनच्या वतीने शिक्षेबाबत युक्तिवाद पूर्ण झाला.

आरोपी संतोष भवाळ याच्यातर्फे ऍड. बाळासाहेब खोपडे व ऍड. विजयालक्ष्मी खोपडे यांनी बाजू मांडली. या खटल्यातील पुरावे संशयास्पद असून, सामाजिक अथवा मीडियाच्या दबावाच्या आधारे आरोपीला शिक्षा होवून असे त्यांनी मांडले. आरोपीचा खुनाशी काहीच संबंध नाही. त्याने गुन्हा केलेला नसतानाही त्याच्या सहभागाचा पुरावा तयार करण्यात आला, असेही ऍड. खोपडे यांनी न्यायालयासमोर सांगितले. 

ऍड. निकम म्हणाले, की तिन्ही आरोपींना जास्ती जास्त म्हणजे फाशीची शिक्षा देण्यासाठी गुन्ह्यातील 13 महत्त्वाची कारणे न्यायालयासमोर मांडली. आरोपींनी कट रचून पीडित मुलीवर अत्याचार व बलात्कार केला आहे. त्यासाठी सबळ परिस्थितीजन्य पुरावे आहेत. गुन्हा करणाऱ्यांबरोबरच कटात सहभागी असलेलेही तेवढेच दोषी आहेत, असेही त्यांनी न्यायालयासमोर मांडले. त्याच्या पृष्ठ्यर्थ ऍड. निकम यांनी इंदिरा गांधी यांच्या खुनाच्या कटातील केहरसिंग व संसदेवरील हल्ल्याच्या कटातील प्रमुख सूत्रधार अफजल गुरु यांना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिल्याचे निवाडे सादर केले.

आरोपी क्रमांक एकच्या वतीने ऍड. योहान मकासरे यांनी, तर तीनच्या वतीने ऍड. प्रकाश आहेर यांनी मंगळवारी (ता. 21) युक्तीवाद केला. शिक्षेबाबत दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर या खटल्याच्या निकालासाठी न्यायालयाने 29 नोव्हेंबर ही तारीख ठेवण्याचा आदेश दिला. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: Kopardi case final hearing ujjwal nikam investigations verdict nikal marathi news