कोरेगाव परिसरात उद्यापासूनच बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

कोरेगाव भीमा - गेल्या वर्षी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा व परिसरात २९ डिसेंबरपासूनच जादा दहापट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा, विजय स्तंभ परिसरासह लोणीकंद, पेरणे, वढू बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापूर परिसरात एक जानेवारीला इंटरनेट सेवेवर प्रतिबंध राहणार आहे. दरम्यान, वाहतुकीसह सर्व सेवांच्या नियोजनाचा आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. विजय स्तंभ परिसरात मोबाईल इंटरनेट सेवेवर प्रतिबंध असला तरी पोलिसांच्या संदेशवहनासाठी बंदोबस्तावरील अधिकाऱ्यांकडे अत्याधुनिक वायरलेस यंत्रणा व आवश्‍यक साधने असणार आहेत.

पुणे-नगर महामार्गावर एक जानेवारीला पेरणे टोल नाका ते शिक्रापूर दरम्यान इतर वाहतूकही पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरपासूनच या टप्प्यात १०० पीएमपी बसच्या साहाय्याने विजय स्तंभापर्यंत अंतर्गत प्रवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. 

स्थानिक करणार स्वागत 
परिसरात सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस दलाने दोन महिन्यांत स्थानिक व्यापारी तसेच ग्रामस्थांच्या २५० पेक्षा जास्त बैठका घेतल्या आहेत. या बैठकांमुळे स्थानिकांतही बंधुत्वाची भावना जागृत झाली आहे. स्थानिक पदाधिकारी, व्यापारी तसेच नागरिकांकडून मानवंदनेसाठी येणाऱ्या बांधवांचे स्वागत पाणी व फुले देऊन केले जाणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Koregaon Bhima Police Bandobast