कोरेगाव भीमा: एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळेंसह दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

भिडे, एकबोटे यांना वाचविण्यासाठी अटक
मनोहर भिडे, मिलिंद एकबोटे यांना वाचविण्यासाठी सरकारकडून ही कारवाई करण्यात आली. सरकारकडून दलितांना लक्ष्य करून ही कारवाई करण्यात येत आहे, असा आरोप दलित कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. 
 

पुणे : कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांकडून एल्गार परिषदेचे आयोजन सुधीर ढवळेंसह अन्य दोघांना आज (बुधवार) सकाळी अटक केली.

पुण्याजवळील कोरेगाव-भीमा येथे 1 जानेवारीला झालेल्या हिंसाचारात एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. तर, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. आता पोलिसांनी गोवंडी येथून सुधीर ढवळे यांना अटक केली आहे. रिपब्लिकन पँथर्सचे कार्यकर्ते अशी सुधीर ढवळे यांची ओळख आहे. सुधीर ढवळे आणि इतरांनी पुढाकार घेऊन 30 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातील शनिवार वाडा येथे एल्गार परिषद घेतली होती. या परिषदेच्या आयोजन बाबत 8 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील विश्रामबाग पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापिका शोमा सेन यांची सध्या चौकशी सुरू असून घराची झडती घेतली जात आहे. 

सध्या देवनार पोलिस स्टेशन येथे त्यांना नेण्यात आले आहे. त्या नंतर पुण्यात आणण्यात येणार आहे. या गुन्ह्यात यूएपीए ऍक्ट देखील लावण्यात आला आहे. 
सुधीर ढवळेंसह नागपूरमधून वकील सुधीर गडलिंग, नक्षलवादाचा आरोप असलेले रोना विल्सन यांनाही अटक करण्यात आली आहे. सहआयुक्त रवींद्र कदम यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांना अटक नाही. यापूर्वी केलेल्या छापेमारीत सबळ पुरावे आढळल्याने घेतला अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अटक केलेले सगळे नक्षलवादाचा शहरी चेहरा असल्याचा आरोप होत आहे.

भिडे, एकबोटे यांना वाचविण्यासाठी अटक
मनोहर भिडे, मिलिंद एकबोटे यांना वाचविण्यासाठी सरकारकडून ही कारवाई करण्यात आली. सरकारकडून दलितांना लक्ष्य करून ही कारवाई करण्यात येत आहे, असा आरोप दलित कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. 

महेश राऊत यांच्याही घराची पोलिसांकडून झाडाझडती
महेश राऊत हे मूळचे गडचिरोली जिल्ह्यातील असून नुकतेच नागपूरात शिफ्ट झाले आहेत. आदिवासी भागात महेश राऊत काम करतात. एल्गार परिषदेतील सहभाग असल्याचा आरोपावरून कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Koregaon Bhima riot elgar parishad Sudhir Dhawale arrested by Pune Police