अर्जावर तातडीच्या सुनावणीस नकार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

मुंबई - कोरेगाव भीमा हिंसाचारादरम्यान झालेल्या युवकाच्या मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना आज मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. आरोपींनी केलेल्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला.

पाच महिन्यांपूर्वी उसळलेल्या दंगलीमध्ये राहुल फटांगळे या युवकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांना अटक केली आहे. आज सुटीकालीन न्या. भारती डांग्रे यांच्यापुढे जामीन अर्जावर सुनावणी झाली. अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्‍यकता नाही, असे स्पष्ट करीत न्यायालयाने जूनमध्ये पुढील सुनावणी निश्‍चित केली आहे. अर्जदार आरोपींचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून, केवळ त्यांनी आंबेडकर असे लिहिलेले टी-शर्ट घातल्यामुळे पोलिसांनी त्यांना संशयाच्या आधारावर अटक केली, असा युक्तिवाद आरोपींच्या वतीने करण्यात आला. तीनही आरोपी वीस वर्षांचे असून, जानेवारीपासून तुरुंगात आहेत.

Web Title: Koregaon Bhima violence