esakal | कोतवाल कर्मचारी संघटनेने महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची घेतली भेट 
sakal

बोलून बातमी शोधा

balasaheb thorat

महाराष्ट्र राज्य कोतवाल कर्मचारी संघटनेच्यावतीने पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागण्यांवर लवकरच बैठक लावू असे आश्‍वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्याची माहिती विठ्ठल गुरव यांनी दिली. 

कोतवाल कर्मचारी संघटनेने महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची घेतली भेट 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : महाराष्ट्र राज्य कोतवाल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची आज संगमनेरमध्ये भेट घेतली. राज्यातील कोतवालांच्या प्रलंबित प्रश्‍नांवर त्यांनी यावेळी बैठक घेतली.

कोतवाल कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी दर्जा द्यावा, पदवीधर कोतवाल कर्मचाऱ्यांमधून मधून तलाठी भरतीमध्ये 40 टक्के आरक्षण द्यावे, कोतवाल कर्मचाऱ्यांना सरसकट 15 हजार रुपये वेतन द्यावे या प्रमुख मागण्या महसूलमंत्री थोरात यांच्याकडे मांडण्यात आल्या आहेत. 

कोतवाल कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यावी, महसूल सहाय्यक भरतीमध्ये 30 टक्के आरक्षण द्यावे, कोतवाल कर्मचारी भरतीमध्ये मयत कोतवाल कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना प्राधान्य द्यावे या देखील मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. यावेळी संजय धरम, प्रविण करडक, विठ्ठल गुरव, जितेंद्र रिपोटे, राजेश गुजाळ, योगेश मिसाळ, सोमनाथ गवळी, दिलीप सावळे, विजय कोळी, दिलीप सावळे, रामा भाड, शिवप्रसाद देवणे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.