गतवर्षीच्या तुलनेत धरणांत साठा बरा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

कोयनेत ३० टीएमसी पाणी; मे महिन्यात तीव्र टंचाई भासण्याची शक्‍यता 
सातारा - जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणांत पाणीसाठा आता सरासरी ४० टक्‍क्‍यांवर पोचला आहे. गतवर्षीच्या तुलतने हा पाणीसाठा बरा असला तरी, मे महिन्यात तीव्र उन्हाळ्यात पाणीटंचाई भासण्याची दाट शक्‍यता आहे. कोयना धरणात गतवर्षी ३०.१० टीएमसी तर, सध्या ३०.४० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, उन्हाळा लांबल्यास पाणीसाठ्यात झपाट्याने घट होण्याचीही शक्‍यता वर्तविली जात आहे. 

गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १३४ टक्‍के पाऊस झाल्याने प्रमुख धरणांतील पाणीसाठा शंभर टक्‍क्‍यांवर पोचला होता. दमदार पावसाने मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने सर्वच धरणांतून प्रकल्प व्यवस्थापनास पाणी सोडावे लागले होते. गत पावसाळ्यातील बहुतांश नद्या दुथडी भरून वाहिल्या. कर्नाटक, आंध्रप्रदेशला पाणी सोडूनही यंदा कोयनेत जवळपास गतवर्षीच्या इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. कोयना धरणात ३०.४० टीएमसी (२८.८८ टक्के) पाणीसाठा आहे. कोयनेतून कर्नाटकास पाणी सोडले गेल्याने कोयना, कृष्णा तीरावरील गावांत पाणीटंचाई जाणवली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा योजना, शेतीपंप सुरू राहिल्याने पिकांवर उन्हाळ्याचा दुष्परिणाम अद्याप तरी जाणवत नाही.

धोम, कण्हेर व उरमोडी ही धरणे दुष्काळी तालुक्‍यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. या तीनही धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत थोडा जास्त पाणासाठी आहे. यामध्ये उरमोडी धरणांत सर्वाधिक ६१.४०, कण्हेरमध्ये ३०.०८ तर धोम धरणात ४०.७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मे महिन्यात दुष्काळी तालुक्‍यात त्यातून पाणी दिले जाणार आहे. तरीही उन्हाळा लांबल्यास, वळीव पाऊस लवकर न झाल्यास तीव्र पाणीटंचाईचा सामना दुष्काळी जनतेला करावा लागणार आहे. पाणलोट कमी झाल्याने धरणक्षेत्रातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. कण्हेर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने मेढ्यासह परिसरातील अनेक गावांत पाणीटंचाई भासत आहे. अनेक धरणांत गाळाचे प्रमाणही वाढले आहे. 

धरणांतील पाणीसाठा (टीएमसी)
धरण    २०१७    २०१६
कोयना    ३०.४०    ३०.१०
धोम    ५.४९    ३.७२
कण्हेर    ३.०४    २.७४
धोम-बलकवडी    ०.५५    ०.६७
उरमोडी    ६.१२    ५.०४
तारळी    २.४९    २.६५
येरळवाडी    ०.४४    ०.१८

Web Title: koyana dam water storage