'कोयनेतील जलवाहतुकीवर बैठकीचा उतारा '

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नागपूर -  कोयना जलाशयात जलवाहतूक सुरू करण्यासाठी जलसंपदा, ऊर्जा आणि वनविभागाची संयुक्‍त बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिले.

सरकारच्या उत्तरामुळे जलवाहतुकीसाठी प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक नौकाधारक व पर्यटकांना आणखी ताटकळत राहावे लागणार आहे. 

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे, नरेंद्र पाटील यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशयात वर्षानुवर्षे प्रकल्पग्रस्तांमार्फत अखंडपणे सुरू असलेली जलवाहतूक अचानक गृहविभागाच्या आदेशामुळे गेली दीड वर्षे बंद आहे. वन विभागाच्या अडवणुकीमुळे अनेक ठिकाणचे रस्ते अपूर्ण अवस्थेत असल्याने गावांमध्ये रस्त्यांवरील वाहतूक होत नाही. त्यामुळे या भागात जलवाहतुकीशिवाय पर्याय नसल्याने ती तातडीने सुरू करण्याची मागणी नरेंद्र पाटील यांनी केली. यावर उत्तर देताना केसरकर यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी सरकार सकारात्मक असल्याचे उत्तर दिले. 

कोयना धरणात जलविद्युत प्रकल्प असल्याने या धरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे संभाव्य अतिरेकी कारवायाचा धोका विचारात घेउन कोयना धरण क्षेत्र अत्यंत संवेदनशील बनले आहे. कोयना धरणाचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र गृहविभागाच्या मानांकनानुसार अ वर्गवारीत म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी जलवाहतूक सुरू करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अडचणी असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. 

Web Title: koyna shipping the meeting