कॉंग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह क्लिन चीट

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 मे 2018

मुंबई : कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबियांना लाचलुचपतप्रतिबंधक न्यायालयाने क्लिन चीट दिली. त्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप करण्यात आला होता. कृपाशंकर सिंह, त्यांची पत्नी मालतीदेवी, मुलगा नरेंद्र मोहन, मुलगी सुनिता, जावई विजय सिंह या सर्वांनाच न्यायालयाने दोषमुक्त केले.

सिंह यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टाने सिंह यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. 2015 मध्ये आर्थिक गुन्हे व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या संपुर्ण कुटुंबीयांविरोधत गुन्हे दाखल केले होते. या चौकशीत सिंह यांच्याकडे बिहेशेबी मालमत्ता असल्याचे निष्कर्ष नोंदविण्यात आले होते. परंतु, न्यायालयाने त्यांना क्लिन चीट दिली.
या प्रकरणी कृपासिंह फेब्रुवारी मध्येच न्यायालयाने दोषमुक्त केले होते. परंतु, त्यांच्या कुटुंबीयांविरोधात खटला सुरू होता. आज त्यांनाही  दोषमुक्त करत यांच्यावर खटला दाखल करता येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. 
 
Web Title: Kripashankar Singh get clean chit