‘कृषिक’ जगात सर्वोत्तम (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

बारामती - 'भारत व ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमधील शेतीच्या समस्या समान आहेत, म्हणूनच मला बारामतीतील कृषिक प्रदर्शनाने प्रभावित केले. उच्च दर्जाच्या जागतिक तंत्राची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणारे येथील केव्हीके यापुढे इक्रिसॅटचे तंत्रदेखील देशभरात पोचवेल, ’’ असा विश्‍वास इक्रिसॅट या आंतरराष्ट्रीय संस्थेचे महासंचालक डॉ. पीटर कार्बेरी यांनी व्यक्त केला.

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने शारदानगर येथे आयोजित केलेल्या कृषिक प्रदर्शनाचे आज डॉ. कार्बेरी यांनी उद्‌घाटन केले. उद्‌घाटनपर भाषणात त्यांनी वरील मत व्यक्त केले. या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, टाटा ट्रस्टचे वरिष्ठ सल्लागार बर्जिस तारापोरवाला, बायरचे सुहास जोशी, नियामचे संचालक डॉ. एन. पी. सिंग, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, मत्स्य आयुक्त अरुण विदळे, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे महाव्यवस्थापक डॉ. अरिज अहमद उपस्थित होते.

डॉ. कार्बेरी म्हणाले, ‘‘आज भारतात आणि ऑस्ट्रेलियातही दुष्काळी स्थिती आहे, त्यामुळे येथे चाललेले शेतीतील नावीन्यपूर्ण प्रयोग पुढील वर्षी ऑस्ट्रेलियातील शेतकऱ्यांनीही पाहावेत, यासाठी त्यांना व इक्रिसॅट आफ्रिकेतील ज्या देशांमधील शेतकऱ्यांसोबत काम करते, तेथील शेतकऱ्यांना येथे घेऊन येणार आहे. बारामतीच्या केव्हीकेने जगातील अद्ययावत शेतीचे तंत्र एकाच ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत थेट पोचवून रोगमुक्त शेतीचे तंत्र शेतकऱ्यांना दाखविले, हे अत्यंत कौतुकास्पद आहे.’’

या वेळी खासदार सुप्रिया सुळे, बर्जिस तारापोरवाला यांचीही भाषणे झाली. ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले.

कमांडरचा रॅम्प वॉक आणि नाचणारी म्हैस
रॅम्प वॉक करणारा दीड टनांचा कमांडर हा रेडा आणि नाचणारी म्हैस पाहून इक्रिसॅटच्या महासंचालकांसह देशभरातील विविध राष्ट्रीय संस्थांचे उच्चपदस्थ अधिकारी प्रभावित झाले. कृषिक प्रदर्शनाच्या उद्‌घाटनानिमित्ताने येथील प्रात्यक्षिके पाहून काश्‍मीरपासून ते राजस्थानपर्यंतच्या शेतकऱ्यांनीही आश्‍चर्याने तोंडात बोटे घातली.

Web Title: Krushik Agriculture Exhibition Best in the world peter carberry