Vidhan Sabha 2019 : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कुणाल पाटील धुळे ग्रामीणमधून

टीम ई-सकाळ
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी आज (मंगळवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये 52 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, धुळे ग्रामीणमधून कुणाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी आज (मंगळवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये 52 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, धुळे ग्रामीणमधून कुणाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  

राज्यातील 52 विविध मतदारसंघासाठी उमेदवार यादी आज जाहीर करण्यात आली. यामध्ये पुणे, धुळे, लातूर, वर्धासह इतर ठिकाणी काँग्रेसचे कोण उमेदवार असतील, याची माहिती देण्यात आली. धुळे ग्रामीणमधून कुणाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कुणाल पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. मात्र, त्यानंतर आता त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, लोकसभेत पराभव पत्कारावा लागलेल्या कुणाल पाटील यांचा विधानसभेत विजय होतो का हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. 

Vidhan Sabha : विलासरावांचे पुत्र धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमधून उमेदवारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kunal Patil gets candidacy for Dhule Rural Maharashtra Vidhan sabha 2019