उद्धव यांच्याकडे पाहून राज यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर...

टीम-ई-सकाळ
Thursday, 28 November 2019

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (ता.२८) मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव यांना शुभेच्छा देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे यांना गहिवरून आले.

मुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (ता.२८) मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव यांना शुभेच्छा देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे यांना गहिवरून आले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक नेत्यांची शिवाजी पार्कवर रीघ लागली होती. या वेळी राज यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरेही शुभेच्छा देण्यासाठी पुढे आल्या आणि त्यांना गहिवरून आले. कुंदाताई या उद्धव ठाकरे यांच्या आई मीनाताई ठाकरे यांच्या सख्या बहीण म्हणजेच उद्धव यांच्या मावशी आहेत.

Image may contain: 3 people, sunglasses

हिच ती वेळ! मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की..
राज हेसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी आपला वारसदार घोषित केल्यावर राज यांनी शिवसेनेला रामराम करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करत वेगळी चूल मांडली होती. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी राज यांच्या उपस्थितीला विशेष महत्व प्राप्त झाले होते.

एकनाथ शिंदे : सामान्य शिवसैनिक ते ठाकरे सरकारमधील मंत्री

दरम्यान, 20 वर्षांनी शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की असे उच्चारताच महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार आज राज्यात स्थापन झाले आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kundatai thackeray and uddhav thackeray gets emotional at oath taking ceremony