कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी राज्यभरात कार्यक्रम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

मुंबई - दरवर्षीप्रमाणे यंदाही कविकुलगुरू वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी 27 फेब्रुवारीला "मराठी भाषा गौरव दिन' साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यंदा "संगणक व महाजालावरील मराठी' या संकल्पनेवर भर देण्यात आला आहे. मातृभाषेची माहिती, तसेच मातृभाषेचे व्यक्तिगत व समाजजीवनातील स्थान आणि मातृभाषेचे मानसशास्त्रीय व शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्व या विषयांवर कार्यक्रम होणार आहेत. राज्यभरात ग्रंथप्रदर्शन, ग्रंथदिंडी, ग्रंथोत्सव आणि शाळा-महाविद्यालयांत निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येतील.

मुंबई - दरवर्षीप्रमाणे यंदाही कविकुलगुरू वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी 27 फेब्रुवारीला "मराठी भाषा गौरव दिन' साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यंदा "संगणक व महाजालावरील मराठी' या संकल्पनेवर भर देण्यात आला आहे. मातृभाषेची माहिती, तसेच मातृभाषेचे व्यक्तिगत व समाजजीवनातील स्थान आणि मातृभाषेचे मानसशास्त्रीय व शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्व या विषयांवर कार्यक्रम होणार आहेत. राज्यभरात ग्रंथप्रदर्शन, ग्रंथदिंडी, ग्रंथोत्सव आणि शाळा-महाविद्यालयांत निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येतील. सरकारी व अन्य कार्यालयांत परिसंवाद तसेच युनिकोड, इनस्क्रिप्ट याशी संबंधित विषयांवरील प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येतील. सोशल मीडियातील मराठी विषयांवर लिहिणाऱ्या तज्ज्ञांची व्याख्यानेही होतील. 

Web Title: kusumagraj Birthday state program