Crime News: घरचे निवडणुकीच्या प्रचाराला गेले होते, ६० वर्षीय म्हाताऱ्याचा मतिमंद मुलीवर अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime Case

Crime News: घरचे निवडणुकीच्या प्रचाराला गेले होते, ६० वर्षीय म्हाताऱ्याचा मतिमंद मुलीवर अत्याचार

लाखनी: येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात मतिमंद मुलीवर ६० वर्षीय वृद्धाने सतत लैगिंक अत्याचार केल्याने ती ५ महिन्याची गरोदर असल्याची घटना गुरुवारी(ता.२५) ला उघडकीस आली.

लाखनी पोलिसांनी लैगिंक अत्याचार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपीचे नाव नारद गणपत वंजारी असे आहे. त्याची डी.एन.ए चाचणी करून जिल्हा कारागृह भंडारा येथील पाठविण्यात आले आहे.

पीडित १७ वर्षीय पीडितेच्या आईचा मृत्यू झाल्यामुळे वडिलांला सोबत घरी राहते. वडील मोलमजुरीचे काम करीत असल्यामुळे दिवसभर घराबाहेर असतो. डिसेंबर २०२२मध्ये या गावाची ग्रामपंचायततील सार्वत्रिक निवडणूक पार पडली.

प्रचारादरम्यान मतिमंद पीडिता घरी एकटीच असल्याचे दिसल्याने या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली धमकी दिल्यामुळे कुटुंबियांना घटनेची माहिती न देता अत्याचार सहन करीत राहिली. त्यामुळे तिला दिवस गेले २४ मे रोजी अचानक तिचे पोट दुखत असल्याचे कुटुंबियांना सांगितले. 

काकूंनी तिला उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे नेले असता कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासणी करून ती २० ते २२ आठवड्याची गरोदर असल्याचे सांगताच कुटूंबियांची पायाखालील वाळु सरकली.

काकूंने पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता शाळेजवळ घर असलेला नारद वंजारी असल्याचे सांगितले. पीडितेसह काकूंने लाखनी पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांना १७ वर्षीय मतिमंद मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबद  सांगितले. त्यांनी लैगिंक अत्याचार व पोस्को कायद्याचे विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.

डी.एन.ए चाचणी करून जिल्हा कारागृह भंडारा येथील पाठविण्यात आले. घटनेचा लाखनी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मागील तीन दिवसातील ही दुसरी घटना आहे.

टॅग्स :policecrime