पंढरीवर लक्ष्मीची कृपादृष्टी

श्री विठ्ठल मंदिराच्या उत्पन्नात सव्वा कोटींची वाढ
Pandharpur
PandharpurCanva

पंढरपूर : चैत्री यात्रा काळात यंदा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला दोन कोटी चार लाख ५२ हजार २१४ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. कोरोनाच्या कारणामुळे मागील दोन वर्षात चैत्री यात्रा भरु शकल्या नव्हत्या.

त्या आधी २०१९ मधील चैत्री यात्रेत मंदिर समितीला ७६ लाख ४९ हजार ९६८ रुपये उत्पन्न मिळाले होते. त्यामुळे दोन वर्षापूर्वीच्या चैत्री यात्रेतील उत्पन्नाच्या तुलनेत यंदा तब्बल एक कोटी २८ लाख दोन हजार २४६ रुपये इतकी लक्षणीय वाढ झाली असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.

कोरोनाच्या सावटामुळे गेली दोन वर्षे चैत्री यात्रा भरू शकली नव्हती. विठुरायाचे पदस्पर्श दर्शन देखील दोन वर्षे बंदच होते. कोरोनाचे संकट दूर झाल्याने गुढीपाडव्यापासून विठुरायाचे पदस्पर्श दर्शन पूर्ववत सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा चैत्री यात्रा काळात लाखो भाविकांनी पंढरपूरला येऊन विठुरायाचे दर्शन घेतले. एक एप्रिल ते १६ एप्रिल या चैत्री यात्रेच्या काळात वारकरी भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला आल्याने पंढरपूरच्या बाजारपेठेत दोन वर्षानंतर मोठी उलाढाल झाली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला देखील विविध माध्यमातून यंदा तब्बल दोन कोटी चार लाख ५२ हजार २१४ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी तथा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

चैत्री यात्रा काळात मिळालेले उत्पन्न

  • श्री विठ्ठल चरणावरील उत्पन्न : १९ लाख ६७ हजार ५५४

  • श्री रुक्मिणीमातेच्या चरणावरील उत्पन्न : सहा लाख २७ हजार

  • श्री विठ्ठल विधी उपचार : १२ हजार

  • अन्नछत्र देणगी : तीन लाख २१ हजार ८११

  • फोटो विक्री : एक लाख १८ हजार ७७५

  • वेदांत भक्तनिवास : एक लाख ८८ हजार ८००

  • व्हिडीओकॉन भक्तनिवास : एक लाख ३७ हजार ७५०

  • श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास : १३ लाख ८४ हजार

  • देणगी : ४४ लाख ७५ हजार २७९

  • नित्यपूजा : ३१ हजार

  • महानैवेद्य योजना : ४५ हजार

  • मनीऑर्डर : ५ हजार २४२

  • अभिषेक पावती : 750

  • साडी जमा : ९५ हजार ५३५,

  • चंदन पावडर : १२ हजार ७३२,

  • चंदन उटीपूजा : १३ लाख ६५ हजार,

  • जमा पावती : पाच लाख १० हजार ५४८,

  • परिवार देवता : १२ लाख १९ हजार ४६१,

  • हुंडी पेटी : ५९ लाख ४६ हजार ३४१

  • ऑनलाईन देणगी : १५ लाख ४३ हजार ३६२

  • जमीनखंड जमा : २० हजार

  • गोशाळा कायम ठेव : ७८ हजार

  • दूध : चार हजार ६४०

  • मोबाईल लॉकर : तीन लाख पाच हजार १३०

  • वाढदिवस अन्नदान योजना : २५ हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com