जमीन ५० कोटींची; लाच ११ कोटींची

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

खंडाळ्यातील ५० कोटींची बेवारस जमीन बळकाविण्यासाठी बांधकाम व्यावसायिक युसूफ लकडावाला याने ११ कोटी ५० लाखांचा खर्च केला आहे. ही रक्कम सरकारी अधिकाऱ्याला लाच व दलालांना दलाली देण्यासाठी खर्च केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी एका अधिकाऱ्यासह दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली.

मुंबई -  खंडाळ्यातील ५० कोटींची बेवारस जमीन बळकाविण्यासाठी बांधकाम व्यावसायिक युसूफ लकडावाला याने ११ कोटी ५० लाखांचा खर्च केला आहे. ही रक्कम सरकारी अधिकाऱ्याला लाच व दलालांना दलाली देण्यासाठी खर्च केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी एका अधिकाऱ्यासह दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली.

भूमी अभिलेख विभागातील अधिकारी विकास ढेकळे आणि दलाल दीपक गुप्ता यांना शुक्रवारी अटक झाली. यापूर्वी बांधकाम व्यावसायिक युसूफ आणि शौकत घोरी यांना अटक झाली होती. साडेअकरा कोटींतील सर्वांत मोठा वाटा म्हणजेच पाच कोटी ढेकळेच्या वाट्याला आले आहेत. गुप्ताला एक कोटी, तर घोरीला दीड कोटी रुपये देण्यात आले. मोहन नायर याला चार कोटी मिळाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

लोणावळ्यात शिजला कट
आरोपी गुप्ताच्या लोणावळा येथील सदनिकेत या व्यवहाराबाबत झालेल्या बैठकांत कट रचण्यात आला. आरोपींनी नवाबाची साडेचार एकर जमीन बळकाविण्यासाठी १९४९ मधील बनावट करारपत्र बनविले. त्याची मुंबई निबंधक कार्यालयात नोंदणी झाल्याचे दाखविले. मावळ दुय्यम निबंधक कार्यालयातील खरी कागदपत्रे गहाळ करण्याचा प्रयत्नही झाला होता.

Web Title: Land worth 50 crores Bribe 11 Crore

टॅग्स