माळशेज घाटात दरड कोसळली 

माळशेज घाटात दरड कोसळली 

ओतूर - नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात गुरुवारी पहाटे दरड कोसळली आहे. मात्र या ठिकाणी त्वरित एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. 

माळशेज घाटात छत्री पॉइंटजवळ मातीचा ढिगारा पावसामुळे महामार्गावर आल्याने वाहतूक थोडी विस्कळित झाली होती, त्यामुळे नगर-कल्याण महामार्गावरील वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. काही वेळातच छत्री पॉइंट या ठिकाणाहून एकेरी वाहतूक सुरू केल्यामुळे वाहतूक कोंडी टळली. राडारोडा हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. गेल्या महिन्यात माळशेज घाटात दरड कोसळण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com