Video : मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेचा मोठा अनर्थ टळला; कसारा घाटात पुन्हा दरड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

इगतपुरी : गेल्या तीन दिवसांपासून घाटमाथ्यावर जोरदार पडत असलेल्या पावसामुळे कसारा घाटात पहाटेच्या सुमारास रेल्वे मार्गावर पुन्हा मोठी दरड कोसळली. यावेळी मुंबईला जाणारी देवगिरी एक्सप्रेसच्या चालकाला ही बाब लक्षात आल्याने चालकाने तातडीने गाडी थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

इगतपुरी : गेल्या तीन दिवसांपासून घाटमाथ्यावर जोरदार पडत असलेल्या पावसामुळे कसारा घाटात पहाटेच्या सुमारास रेल्वे मार्गावर पुन्हा मोठी दरड कोसळली. यावेळी मुंबईला जाणारी देवगिरी एक्सप्रेसच्या चालकाला ही बाब लक्षात आल्याने चालकाने तातडीने गाडी थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

या एकाच महिन्यात पावसामुळे रेल्वे मार्गावर पंधरा दिवसापूर्वी घाटातील बोगद्याबाहेर दरड कोसळ्ली होती. तर आठवड्यापूर्वी अंत्योदय एक्सप्रेसचा डबा रेल्वे घाटातील पुलावर एक डबा रुळावरून घसरल्याने मोठी दुर्घटना टळली होती. तसेच मुंबई आग्रा महामार्गावर देखील दोन वेळा दरड कोसळण्याची मालिका सुरुच आहे व एक वेळा झाड कोसळले होते.
या बाबत माहिती अशी की, तीन दिवसांपासुन घाटात जोरदार व संततधार पाऊस सुरु आहे. या पडणाऱ्या पावसामुळे 26 जुलैला पाचच्या सुमारास कसारा घाटातील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तीन नंबर बोगद्याच्या जवळपास रेल्वे मार्गावर मोठी दरड कोसळली. याच वेळी सव्वापाच वाजता याच रुळावरून मुंबईच्या दिशेने ट्रेन नंबर 17058 देवगिरी एक्सप्रेस जात होती.

घाटात धुके असुनही देवगिरीच्या चालकाला ही दरड कोसळल्याचे लक्षात येताचं त्यांनी तातडीने गाडी थांबवल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती चालकाने रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी एस. एस. बर्वे यांना दिली. रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व कर्मचारी आणि अपत्कालीन विभागाच्या कर्मचारींनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रुळावर पडलेली दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले. या घटनेमुळे मुंबईला जाणारी देवगिरी एक्सप्रेस सुमारे दिड तास कसारा घाटात उभी होती. 

रेल्वे रुळावरील दरड काढल्यानंतर देवगिरी एक्सप्रेस मुंबईला रवाना करून रेल्वे वाहतुक सुरळीत केली. मुंबईला जाणारी व मुंबईहून येणारी वाहतुक सुरळीत असल्याची माहीती रेल्वे प्रशासनाने दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Landslide at Kasara Ghat and railway stops towards Mumbai