esakal | देशातील पक्ष्यांच्या प्रजाती निम्म्याने घटल्या

बोलून बातमी शोधा

Birds

भारतात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण ६० ते ८० टक्के घटले आहे. या पक्ष्यांच्या प्रजननस्थळांच्या ठिकाणीही ही घट असल्याने हा परिणाम दिसून येत आहे. मध्य रशियात याचा अभ्यास झालेला नाही. मात्र, पूर्व रशिया आणि युरोपात झालेल्या अभ्यासावरून ही बाब स्पष्ट झाली. त्यात सोनेरी पक्षी, सॅन्डपायपर, चिखल्या हे ८० टक्‍क्‍यांपर्यंत घटले आहेत. 
- अश्‍विन विश्‍वनाथन, नेचर कॉन्झर्वेशन फाउंडेशन, बंगळूर

देशातील पक्ष्यांच्या प्रजाती निम्म्याने घटल्या

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - गेल्या २५ वर्षांत देशातील पक्ष्यांच्या निम्म्या प्रजातींची संख्या घटली आहे. त्यात गिधाडे, गरुड, सोनेरी पक्षी यांचा समावेश आहे. वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या कमी होत असल्याचे बोलले जात असताना ग्रामीण भागात त्यांची संख्या काहीशी वाढली असून शहरात मात्र घटली आहे. मोरांच्या संवर्धनासाठी होणाऱ्या प्रयत्नांमधून त्यांची संख्या वाढली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशभरातील पक्ष्यांच्या स्थितीचा अहवाल सोमवारी (ता. १७) गांधीनगरमध्ये प्रसिद्ध करण्यात आला, त्यात ८६७ प्रजातींचा अभ्यास झाला. या अहवालासाठी पंधरा हजारांपेक्षा जास्त पक्षिनिरीक्षकांनी सहभाग नोंदविला. भारतात पक्ष्यांच्या स्थितीविषयी प्रथम असा अभ्यास करण्यात आला.

पुणे शहरात धावणार दोनशे मिडी बस 

यात देशातील दोन सरकारी आणि आठ स्वयंसेवी संस्था सहभागी होत्या. त्यामध्ये अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकोलॉजी ॲण्ड एन्व्हायर्न्मेंट, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, फाउंडेशन फॉर इकॉलॉजिकल सिक्‍युरिटी, नॅशनल बायोडायव्हर्सिटी ॲथॉरिटी, नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकॅल सायन्स, नेचर कॉन्झर्वेशन फाउंडेशन, सालिम अली सेंटर फॉर ओर्निथॉलॉजी ॲण्ड नॅचरल हिस्ट्री, वेटलॅंडस इंटरनॅशनल साउथ एशिया, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर इंडिया यांचा सहभाग होता.   

पुण्यासह राज्यात उन्हाचा चटका 

पक्षिनिरीक्षकांनी ‘ई बर्ड’च्या माध्यमातून संकलित केलेल्या माहितीनुसार गेल्या २५ वर्षांत पक्ष्यांच्या ४८ टक्के जाती सुरक्षित, स्थिर असून त्या वाढल्या आहेत, तर गेल्या ५ वर्षांत पक्ष्यांच्या सुमारे ७९ जाती घटल्या आहेत. सुमारे १०१ पक्ष्यांच्या जातींना संरक्षण मिळणे गरजेचे आहे. तसेच, सामान्य पक्ष्यांची संख्या कमालीची घटत आहे. देशभर मोरांच्या संवर्धनासाठी होत असलेल्या प्रयत्नांमुळे त्यांची संख्या वाढली आहे. केरळमध्ये मात्र, आजवर दुर्मीळ असलेले मोर आता मोठ्या संख्येने आढळत आहेत.

वातावरणबदल, पावसाचे प्रमाण यामुळे यात वाढ झाल्याचे नेचर कॉन्झर्वेशन फाउंडेशनचे संशोधन साहाय्यक अश्‍विन विश्‍वनाथन यांनी सांगितले. शिकारी पक्षी, स्थलांतरित पाणपक्षी, चिखल्या आणि अधिवासनिष्ठ पक्षी यांच्या संख्येत कमालीची घट आढळली.