हा मनसेचा शेवटचा पराभव - राज ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

मुंबई - आताच्या निवडणुकांत पाहिलेला मनसेचा शेवटचा पराभव ठरेल. यापुढे तुम्ही पराभव पाहणार नाही. काम न करता जिंकलेल्यांनी आतापर्यंत जे जे केले, ते ते सारे यापुढील काळात मी करणार आहे. निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी वापरलेले फासे आता मी वापरणार आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांत पुन्हा जोश निर्माण केला. मनसेच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहातील मेळाव्यात राज बोलत होते. 

महापालिकांच्या निवडणुका केवळ पैशांच्या जोरावर लढल्या गेल्या. पैसा जिंकला आणि कामे हरली, असेच या निवडणुकीचे विश्‍लेषण करता येईल. या निवडणुकांतून माझ्यासह कार्यकर्तेही खूप काही शिकले आहेत. त्यामुळे ज्यांनी मतदान केले आणि ज्यांनी केले नाही त्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो, असे राज म्हणाले. या पराभवातून खचून जायचे नाही, हे न सांगता त्यांनी 2019 मधील निवडणुकांसाठी काम करावे, असा संदेश कार्यकर्त्यांना दिला. ज्या पक्षाकडे उमेदवार नव्हते, ते लोक निवडणूक आले, याचे आश्‍चर्य वाटते, असे ते म्हणाले. निवडणूक कशी लढवली पाहिजे, याचे ज्ञान गेल्या निवडणुकांमुळे मिळाले, असे ते उपरोधिकपणे म्हणाले. निवडणूक काळात वाद सुरू होता, एकमेकांना अपशब्द वापरण्याचे प्रकार होत होते. त्याच आधारावर निवडणूक लढवली जात असेल, तर येणारा काळ संबंधित पक्षांसाठी खूप भयंकर असेल, असेही ते म्हणाले. 

नाशिक महापालिकेचा निकाल धक्कादायक आहे. बाहेरून पैसा आणून तिथे आम्ही कामे केली; पण लोकांना त्याचे काही महत्त्व नाही. भाजपने गुंड उमेदवार निवडणुकीत उतरवले. त्यांना मतदारांनी निवडून दिले, याचे दुःख वाटते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. म्हातारी मेल्याचे दुःख नाही; पण काळ सोकावतो आहे, याचे वाईट वाटते. आतापर्यंत मला भेटण्यासाठी कार्यकर्ते इकडे येत होते; पण यापुढील काळात माझ्यासकट नेतेमंडळी तुम्हाला भेटायला येतील, अशी सादही त्यांनी या वेळी कार्यकर्त्यांना घातली. 

परिचारकांना चपलीने बडवले पाहिजे 
सैनिकांच्या पत्नींसंदर्भात भाजप आमदार परिचारक यांनी केलेले वक्तव्य भयंकर आहे. अशा व्यक्तीला भर चौकात चपलीने बडवले पाहिजे, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी परिचारक यांचा समाचार घेतला. ते भाजपचे आमदार असल्यामुळे त्यांच्यावर कशी कारवाई होणार, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 

Web Title: The last defeat MNS - Raj Thackeray