गानकोकिळा लता मंगेशकर यांना मुक्त विद्यापीठाची मानद डी. लिट. 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

नाशिक - येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा 23 दीक्षान्त समारंभ सोहळा उद्या (ता. 7) सायंकाळी विद्यापीठाच्या प्रांगणात होत आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, यंदाच्या दीक्षान्त सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, गानकोकिळा व भारतरत्न लता मंगेशकर यांना मुक्त विद्यापीठातर्फे मानद "डी. लिट.' या पदवीने सन्मानित केले जाणार आहे. डी. लिट. पदवीप्रदान सोहळा मुंबईत लवकरच आयोजित केला जाणार आहे. 

दीक्षान्त सोहळ्यात 1 लाख 40 हजार 484 विद्यार्थ्यांना पदवीप्रदान केली जाणार आहे. यामध्ये 1 लाख 14 हजार 643 विद्यार्थ्यांना पदवी, 21 हजार 11 विद्यार्थ्यांना पदविका, 4 हजार 813 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदविका तर 17 विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवीप्रदान केली जाणार आहे. विशेषत: यामध्ये यंदाही 45 टक्के प्रमाण हे महिलांचे आहे. तर घरसंसार, नोकरी, व्यवसाय सांभाळून शिक्षण पूर्ण करणाऱ्यांचे प्रमाण 80 टक्के आहे. पीएच. डी. पदवी स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक पांढरपट्टे यांचाही समावेश आहे.

Web Title: Lata Mangeshkar Open University honorary D. Litt.