गंगाप्रसाद अग्रवाल यांना "जीवन गौरव'

गंगाप्रसाद अग्रवाल यांना "जीवन गौरव'

लातूर - अमेरिकास्थित मराठी लोकांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे मराठी साहित्य, समाजकार्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नऊ जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. साहित्य जीवन गौरव पुरस्कारासाठी अनिल अवचट (पुणे), समाजकार्य जीवन गौरव पुरस्कारासाठी वसमत (जि. हिंगोली) येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक गंगाप्रसाद अग्रवाल यांची निवड झाली. डॉ. हमीद दाभोलकर यांनी गुरुवारी (ता. 21) येथे पत्रकार परिषदेत यासंर्भात माहिती दिली. पुरस्कारार्थींत नाटककार अजित दळवी यांचाही समावेश आहे.

या संस्थेतर्फे गेल्या 24 वर्षांपासून हे पुरस्कार दिले जात आहेत. 2017 साठीच्या पुरस्कारांत साहित्य, समाजकार्यासाठी प्रत्येकी चार तर एक डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार आहे. साहित्य जीवन गौरव पुरस्कार सामाजिक जाणिवांचे लेखक अनिल अवचट तर समाजकार्य जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक गंगाप्रसाद अग्रवाल यांची निवड झाली. प्रत्येकी दोन लाख रुपये, स्मृतिचिन्ह असे या दोन्ही पुरस्कांराचे स्वरुप आहे. शालेय विद्यार्थ्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणारे अरविंद गुप्ता यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार जाहीर झाला. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह असे त्याचे स्वरुप आहे.

सई परांजपे (मुंबई) यांच्या "सय - माझा कलाप्रवास" या पुस्तकाला अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार, तर कल्पना दुधाळ (दौंड) यांच्या "धग असतेच आसपास' या काव्यसंग्रहास ललित ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला. औरंगाबादच्या अजित दळवी यांना "समाजस्वास्थ्य' या नाटकाच्या लेखनासाठी रा. शं. दातार नाट्य पुरस्कार दिला जाईल. 25 हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे या तिन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com