राहुल गांधींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब : पृथ्वीराज चव्हाण

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

मुंबई : मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या हिंदी भाषिक प्रदेशातील भाजपच्या अत्यंत महत्वाची हिंदीच्या हृदयभूमीतील ही राज्ये आहेत. छत्तीसगडमध्ये आम्हाला स्पष्ट यश मिळाले आहे. तर भाजपचा दारूण पराभव झाला. यामध्ये मुख्यमंत्र्यांचाही पराभव झाला आहे. त्यामुळे आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (मंगळवार) सांगितले.

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहे. या निवडणुकीत काँग्रेस आघाडीवर असून, भाजप पिछाडीवर आहे. त्यावर आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले, की छत्तीसगडमध्ये आम्हाला स्पष्ट यश मिळाले आहे. तर भाजपचा दारूण पराभव झाला. यामध्ये मुख्यमंत्र्यांचाही पराभव झाला. गेल्या 15 वर्षांतील राज्य किंवा भाजपची परिस्थिती पाहिली आणि बहुमत पाहिले तर हे भाजपसाठी मोठे अपयश आले. काँग्रेसचे यशामुळे राहुल गांधींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. हा कौल मोदींविरोधात दिला आहे. कर्जमाफी, कृषिसंकट आणि लोकांची फसवणूक त्याचा वसपा जनतेने काढला.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने आणि भाजपविरोधात आघाडी होऊ नये, यासाठी दहशत, ब्लॅकमेलिंगचा वापर केला जात आहे. मात्र, सध्या येत असलेल्या निकालामुळे जनतेमधील भीती, दहशत नाहीशी होणार आहे. मोदींचा पराभव होऊ शकतो. हे निवडणुकीतून दाखवले आहे.

Web Title: Leadership of Rahul Gandhi has confirmed says Prithviraj Chavan