राज्यातील कुष्ठरोगी वाढले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

मुंबई - राज्य सरकारने केलेल्या कुष्ठरोग शोध पाहणीत ४ हजार ८९४ कुष्ठरोगी आढळून आले आहेत.  विशेष म्हणजे घराघरांत जाऊन केलेल्या या पाहणीत लपून राहिलेले रुग्णदेखील सापडल्याने कुष्ठरोग्यांची संख्या वाढल्याचा दावा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी केला आहे.

कुष्ठरोग शोध अभियानात शंभर टक्के ग्रामीण लोकसंख्येची तपासणी आरोग्य विभागाने केल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी विधान परिषदेच्या लेखी प्रश्नोतरात दिली आहे.

या पाहणीत पालघर जिल्ह्यात ४०१ रुग्ण, चंद्रपूर जिल्ह्यात ३८२ रुग्ण व उस्मानाबाद जिल्ह्यात १५४ नवीन कुष्ठरोगी आढळल्याने कुष्ठरोग्यांची एकूण संख्या ४ हजार ८९४ आढळली आहे. देशातून कुष्ठरोग पूर्णत: हद्दपार झाला नसतानाही केंद्र सरकारने कुष्ठरोग निर्मूलन झाल्याची जाहीर करण्याची घाई केली. त्यामुळे घराघरांत जाऊन सवर्क्षेण करण्याची आरोग्य खात्याच्या व्यवस्थेला खीळ बसली. या रोगाची लक्षणे दिसणाऱ्यांनी रुग्णालयात येऊन उपचार घ्यावे, असे नव्याने धोरण आखण्यात आले. याला नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही. समाजाच्या भीतीमुळे रुग्ण घराच्या बाहेर येऊन रुग्णालयापर्यंत पोचलेच नाहीत. या चुकीच्या धोरणाचा थेट परिणाम कुष्ठरोग्यांची संख्या वाढण्यात झाला. १९८१-८२ मध्ये प्रत्येक दहा हजार लोकसंख्येमध्ये ६२.४ कुष्ठरुग्ण सापडत होते.

Web Title: Leprosy increase in state