तुमच्याजवळ वीज कोसळणार असेल, तर मोबाईलवर कळेल

तुमच्याजवळ वीज कोसळणार असेल, तर मोबाईलवर कळेल

पुणे - आकाशातून पडणाऱ्या विजेची पूर्वसूचना मिळून त्यापासून संरक्षण करण्यासाठी तुमच्या हातात फक्त अर्धा ते पाऊण तास असतो. त्यामुळे जिल्ह्याच्या आपत्कालीन व्यवस्थापनाकडे वीज पडण्याची पूर्वसूचना मिळून तो संदेश लोकांपर्यंत पोचेपर्यंत विजांचा कडकडाट सुरूदेखील होतो. त्यातून त्याला पर्याय म्हणून आता थेट लोकांना वीज पडण्याचा इशारा देणारी यंत्रणा भारतीय हवामान खात्याने विकसित केली आहे. 
आकाशात काळेकुट्ट ढग आल्यानंतर विजेच्या कडकडाटापर्यंत खूप कमी वेळ आपल्या हातात असतो. आपण उष्णकटिबंधीय हवामान प्रदेशात राहतो. त्यामुळे येथील वातावरणात झपाट्याने बदल होतो. हेच या हवामान प्रदेशाचे वैशिष्ट्ये आहे. त्यामुळे वीज पडण्याचा अंदाज जेमतेम अर्धा ते पाऊण तास आधी वर्तविता येतो. आतापर्यंत हा अंदाज जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे पाठविला जात होता. तो आता थेट लोकांपर्यंत पोचण्याची स्वतंत्र यंत्रणा वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांच्या टॉवरच्या माध्यमातून पाठविण्यात येत आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे महासंचालक डॉ. के. जे. रमेश  यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

वीज पडण्याचा इशारा मिळाल्यानंतर तुमच्या हातात फक्त चाळीस मिनिटे असतात. त्यात आपत्कालीन यंत्रणा सक्रिय करेपर्यंत  विजांचा लखलखाट सुरू होतो. त्यामुळे यात वेळ घालवून चालत नाही. तातडीने स्वतः आणि आपल्या जवळच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची गरज असते. यात प्रशासनापेक्षा प्रत्येक नागरिकाला विजांबद्दल माहिती मिळणे आवश्‍यक असते, त्यासाठी ही यंत्रणा विकसित केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  

...अशी उभारणार व्यवस्था
सुमारे पाच किलोमीटरच्या परिघातील मोबाईल टॉवरवरून वीज पडण्याची सूचना सर्व कंपन्यांच्या मोबाईल फोनवर ‘एसएमएस’व्दारे दिली जाईल. यापूर्वी वीज कोणत्या भागात पडल्या आहेत. सध्या कुठे पडत आहेत आणि पुढील अर्ध्या-पाऊण तासात कुठे वीज पडतील, याचा अचूक अंदाज यातून थेट लोकांच्या मोबाईल फोनवर मिळणार आहे. मोबाईलवर आलेले काही ‘एसएमएस’ आपण दुर्लक्षित करतो. पण, याकडे दुर्लक्ष होऊ नये. त्याची दखल गांभीर्याने घ्यावी, यासाठी स्वतंत्र रिंगटोन ठेवण्यात येणार आहे, असेही रमेश यांनी सांगितले. 

विजांच्या कडकडाटापूर्वीची स्थिती
- दृष्यमानता कमी होते
- वारे वाहण्याचा वेग वाढतो
- सगळीकडे अंधारून येते

काय करू नये
- झाडाखाली उभे राहू नका
- पत्र्याखाली उभे राहू नका
- मोकळ्या मैदानात उभे राहू नका
- विजेच्या खांबापासून दूर राहावे

काय करावे
- पक्‍क्‍या घराजवळ उभे राहावे
- पाण्यात काम करणाऱ्यांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी जावे
- पायाखाली कोरडे लाकूड, प्लॅस्टिकची वस्तू घ्यावी
- पाण्याच्या स्रोतापासून दूर राहावे

मोबाईल टॉवरच्या माध्यमातून त्या परिसरातील लोकांना वीज पडण्याचा संदेश देणारी यंत्रणेचा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाला आहे. त्यामुळे देशात सर्वत्र ही यंत्रणा आता या उन्हाळ्यापासून सक्रिय करण्यात येणार आहे. त्यासाठी आता नागरिकांना पडणाऱ्या विजेपासून संरक्षणासाठी काय करावे आणि काय करून नये, याबाबत जागृती करणे आवश्‍यक आहे.
-डॉ. के. जे. रमेश, महासंचालक, भारतीय हवामान विभाग

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com