Liquor
Liquoresakal

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! दारुची होम डिलीव्हरी बंद होणार...

याबद्दले निर्देश लवकरच दारू विक्रेत्यांना दिले जाणार आहेत.

कोरोनाच्या काळात सुरू केलेली घरपोच दारू पुरवण्याची सुविधा आता लवकरच बंद होणार आहे. राज्य सरकारने याविषयी उत्पादन शुल्क विभागाला निर्देश दिले आहेत. त्यानुसार आता लवकरच मद्यविक्रेत्यांना सूचना देण्यात येणार आहेत. (Liquor Home Delivery in Maharashtra)

राज्यात जेव्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत होती, त्यावेळी सरकारने दारुची होम डिलीव्हरी सुरू केली होती. मात्र केवळ डिलीव्हरीचा परवाना असलेल्या दुकानांनाच डिलीव्हरी करता येत होती. डिलीव्हरी करायला जाणाऱ्या व्यक्तीने मास्क आणि ग्लोव्ह्स परिधान करणं बंधनकारक होतं.

Liquor
पुन्हा मास्कसक्ती होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

होम डिलीव्हरीसाठी दारुच्या दुकानांचा संपर्क शोधण्यासाठी अनेकदा गुगल सर्च केलं जायचं. मात्र यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. विविध दारुच्या दुकानांच्या नावांवर गुगलवर असलेल्या नंबरमध्ये बदल केले जायचे आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचंही समोर आलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com