शिवस्मारकावरही 'जीएसटी'चा भार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांचा खिसा कापणारा कर म्हणून संभावना केली जाणाऱ्या सेवा व वस्तू कराचा (जीएसटी) फटका राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकालाही बसला आहे. अनेक कारणांमुळे दिरंगाई झाल्यामुळे स्मारकाचे काम रखडल्याने मूळ किमतीत एक हजार कोटींनी वाढ झाली असून, त्यात "जीएसटी' कराची 309 कोटींची रक्‍कम समाविष्ट आहे. 

अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामास अद्याप सुरवात झाली नसली, तरी या स्मारकाच्या खर्चात एक हजार कोटींची वाढ झाली आहे. दोन वर्षांपूर्वी या स्मारकासाठी नेमलेल्या व्यवस्थापन सल्लागार कंपनीने दोन हजार 692 कोटी 40 लाख रुपयाचे अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र, आता या स्मारकाचे काम लांबल्याने तीन हजार 643 कोटी 78 लाख कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे. 

स्मारकाच्या वाढीव खर्चात तब्बल 309 कोटी रुपये "जीएसटी'वर खर्च होणार असल्याचे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सुरक्षेसाठी 236 कोटी, तर कायमस्वरूपी पाणी आणि विजेसाठी 45 कोटी रुपये, आकस्मित खर्च 112 कोटी रुपये गृहीत धरण्यात आले आहेत. संगणकीकरण व्यवस्था उभारण्यावर 56 कोटी रुपये खर्च होणार आहेत.

गिरगाव चौपाटीजवळ असलेल्या 16.86 हेक्‍टर आकाराच्या खडकावर हे शिवस्मारक उभारले जाणार आहे. चौपाटीपासून ही जागा 3.6 किलोमीटर अंतरावर, नरिमन पॉइंटपासून 2.6 किमी अंतरावर, तर राजभवनपासून 1.2 किमी अंतरावर आहे.

Web Title: The load of GST on Shiv Smarak also