कर्जमाफीचा कर्जवाटपावर परिणाम 

तात्या लांडगे 
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

सोलापूर : कर्जमाफीची प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून ठप्प झाल्याने त्याचा परिणाम नव्या कर्जवाटपावर होत आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा अग्रणी बँकेने सर्व बँकाना देऊनही आतापर्यंत फक्‍त 50 हजार शेतकऱ्यांनाच कर्ज मिळाले आहे.

सोलापूर : कर्जमाफीची प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून ठप्प झाल्याने त्याचा परिणाम नव्या कर्जवाटपावर होत आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा अग्रणी बँकेने सर्व बँकाना देऊनही आतापर्यंत फक्‍त 50 हजार शेतकऱ्यांनाच कर्ज मिळाले आहे.

मागील महिन्यापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जवाटप मंदावले असून जून-जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात बँकेने केवळ सहा कोटी रुपयांचेच कर्जवाटप केले आहे. वास्तविकपणे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांकडून कर्जाची मागणी मोठ्या प्रमाणावर होते. परंतु, जिल्हा बँकेची आर्थिक परिस्थिती आणि राष्ट्रीयीकृत बँकांची उदासिनता या पेचात आता जिल्ह्यातील शेतकरी अडकल्याचे चित्र आहे. 13 जुलैपर्यंत जिल्हा बँकेने 170 कोटी रुपयांचे कर्जवाटप केले परंतु, त्यानंतर आतापर्यंत फक्‍त पाच कोटी रुपयांचेच कर्जवाटप केल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

50 हजार शेतकऱ्यांनाच कर्ज 

यंदाच्या खरीप हंगामात जिल्हा बँकेसह ग्रामीण, राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांना जिल्हा अग्रणी बँकेकडून एक हजार 386 कोटी 87 लाख रुपयांचे कर्ज जिल्ह्यातील एक लाख 50 हजार 550 शेतकऱ्यांना वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. परंतु, खरीप संपत आला तरीही आतापर्यंत फक्‍त 54 हजार शेतकऱ्यांनाच कर्ज मिळाले आहे. आणखी तब्बल एक लाख शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेतच आहेत. 

ओटीएस पात्र खातेदारांनी पैसे भरल्याने कर्जवाटप जून-जुलै महिन्यात कर्जवाटप अधिक होते. परंतु, ओटीएस ला सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिल्याने दीड लाखांवरील थकबाकीदारांकडून पैसे भरले जात नाहीत. त्यामुळे कर्जवाटप कमी झाले आहे.
 
- अविनाश देशमुख, प्रशासक, जिल्हा मध्यवर्ती बँक

Web Title: loan waivers for farmers