Local administration ready to face crisis said Chief Minister Uddhav Thackeray
Local administration ready to face crisis said Chief Minister Uddhav Thackeray

संकटाच्या छाताडावर चाल करून जाऊ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

पुणे : कोरोना असताना आलेले वादळ आणि त्या सोबतचा मुसळधार पाऊस, ही आपली परीक्षा आहे. त्यामुळे सध्या संकटाची परिस्थिती निर्माण झाली. आपण एकत्र येऊन संकटाच्या छाताडावर चाल करून जाऊ. त्याला घाबरू नका. नागरिकांमध्ये जिद्द आहे, त्या बळावर आपण या संकटातून बाहेर पडू, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील जनतेला संबोधित करताना केले. 

 सावधान ! पुण्यातील `या` भागात तुमच्या सोबतही असा भयानक प्रकार घडू शकतो

ठाकरे म्हणाले की,''सध्या वादळ वेगाने येत असून त्या सोबत पाऊस आणत आहे. वादळामुळे किनारपट्टीपासून म्हणजे अलीबाग, पालघर आदी परिसरात सावध रहाण्याची गरज निर्माण झाली आहे. वादळामुळे मुसळधार पाऊस पडेल. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकतो. काही ठिकाणी त्यामुळे वीज पुरवठा खंडित करावा लागेल. त्याची नागरिकांनी जाणीव ठेवावी आणि त्यानुसार तयारी करावी. ''

चार वर्षापूर्वी निर्देश देऊनही 'यूजीसी'च्या ऑनलाइन अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष

संकटाचा सामना करण्यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज आहे. धोक्याच्या पट्ट्यातील नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. प्रशासन जबाबदारीने काम करीत असून नागरिकही त्यांना साथ देत आहे. त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करा. त्यांनी निवडलेल्या जागी वेळेत स्थलांतर करा. वादळातील पाऊस वेगळा असतो. वादळाचा इशारा सोमवारी आला. त्यानुसार बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कोरोनासाठी बांधलेल्या शेडमधील रुग्णांना इतरत्र हलविले आहे. कोठेही शेडमध्ये रुग्ण ठेवू नका अथवा तेथे थांबू नका, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय म्हणाले मुख्यमंत्री...
- बुधवारी दुपारपर्यंत वादळ असेल. पिण्याच्या पाण्याचा साठा करून ठेवा- नसल्यास विजेची अनावश्यक उपकरणे वापरू नका 
- फोन, पॉवर बॅंक आदी उपकरणे चार्ज करून ठेवा 
- जीवनावश्यक वस्तू हाताशी ठेवा 
- सैल वस्तू बांधून ठेवा, आडोशाला जाऊ नका.
- दूरदर्शन, आकाशवाणीच्या सूचनांकडे लक्ष द्या.
 

Big breaking : अबब! आजचा पुण्यातील मृतांचा आकडा वाचा; नागरिकांनो आतातरी काळजी घ्या


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com