स्थानिक स्वराज्य मतदारसंघ निवडणूक 'अर्थ'पूर्ण?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

मुंबई - स्थानिक स्वराज्य प्राधिकारी संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 19 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी पात्र असलेल्या मतदारांना खेचण्यासाठी जोरदार रस्सीखेच असल्याने घोडेबाजार तेजीत येणार असल्याचे बोलले जात आहे. 

मुंबई - स्थानिक स्वराज्य प्राधिकारी संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 19 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी पात्र असलेल्या मतदारांना खेचण्यासाठी जोरदार रस्सीखेच असल्याने घोडेबाजार तेजीत येणार असल्याचे बोलले जात आहे. 

स्थानिक स्वराज्य प्राधिकारी संस्था मतदारसंघातून भंडारा-गोंदिया, यवतमाळ, नांदेड, जळगाव, सातारा-सांगली आणि पुणे या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महानगरपालिका नगरसेवक, नगर परिषदा, नगरपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत सभापती हे मतदार असतात. विद्यमान मतदारांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यत्वाचा कालावधी लवकरच संपत आहे. त्यामुळे मतदान करण्यासाठी या सदस्यांची ही शेवटची निवडणूक ठरणार आहे. त्यामुळे राजकीय घोडेबाजाराला तेजी येण्याची चिन्हे आहेत. 

नगरसेवक, जिल्हा परिषद तसेच पंचायत सभापती पदांचा कालावधी संपणार असून, पुन्हा निवडून येईल अथवा नाही तसेच पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळेल अथवा नाही, अशा प्रकारचे अनिश्‍चित वातावरण राहणार आहे. परिणामी, या सदस्यांचा मतदार म्हणून "अर्थ'पूर्ण भाव वधारणार असल्याची चिन्हे आहेत. पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान करा, असा पक्षादेश काढला जाणार असला तरीही हे मतदान गुप्त पद्धतीने होणार असल्याने पक्षादेश सरसकट धाब्यावर बसवला जाईल, असे जाणकार सांगतात. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, शिवसेना, भाजप या पक्षाच्या वतीने उमेदवार रिंगणात आहेत. तसेच काही अपक्ष तगडे उमेदवारही रिंगणात आहेत. त्यामुळे प्रत्येक मताचा भाव वधारणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: Local constituency election