लॉकडाउनच्या काळात या तीन आयटी कंपन्यांच्या वाहतूक खर्चात झाली मोठी बचत

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 July 2020

नफ्यावर परिणाम
लॉकाडाउनमुळे या तीनही आयटी कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. मात्र वाहतूक खर्चात बचत झाल्यामुळे नफ्याचे प्रमाण टिकवण्यात कंपन्यांना यश मिळाले. या तिमाहीत इन्फोसिसचा नफा  १२.४ टक्‍क्‍याने वाढला, तर विप्रोचा नफ्यात ८.८ टक्के वाढ झाली. मात्र ‘टिसीएस’च्या  नफ्यात १३.५ टक्के एवढी  घसरण झाली आहे. या काळात तीनही कंपन्यांच्या शेअरच्या किमतीत वाढ झाली आहे.

मुंबई - लॉकडाउनच्या काळात देशातील तीन बड्या आयटी कंपन्यांच्या वाहतूक खर्चात मोठी बचत झाल्याचे चित्र आहे. या काळात बहुतांश कर्मचारी घरातून काम करत असल्यामुळे ही घट झाली. मात्र या दरम्यान बैठकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सचा आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे संवाद साधण्याच्या खर्चामध्ये २० ते ३० टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एप्रिल- जून या तिमाहीचा ताळेबंद अहवालातून ही आकडेवारी पुढे आली आहे. यापूर्वी आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची ने-आण करणे आणि इतर वाहतुकीचा खर्च अधिक होत असत. मात्र एप्रिल- जून या तिमाहीत हा खर्च ८६ टक्‍क्‍याने कमी झाला आहे आहे.  एप्रिल ते जून या तिमाहीत इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टिसीएस) आणि विप्रो या कंपन्यांचा वाहतूक खर्च दोन हजार १५३ कोटी रुपयांवरून ५०० कोटींपर्यंत कमी झाला आहे. 

सुरक्षित अंतराच्या नियमामुळे अनेक कर्मचारी घरातून काम करत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांसोबत जोडलेले राहण्यासाठी, बैठकांसाठी व्हिडिओ कॉन्फरसिंग आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर वाढला. 

त्यामुळे हा खर्च  ६०० कोटीवरून ७४२ कोटीपर्यंत वाढला आहे. कोरोना संसर्गापूर्वी आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांचे वेतन, सल्ला, उप कंत्राट यानंतर तिसरा मोठा खर्च वाहतूक व्यवस्थेवर होत होता.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown three IT companies big savings in transportation costs