लोकायुक्त का नेमला नाही? - अण्णा हजारे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

राळेगणसिद्धी - देशातील सर्व राज्य सरकारांनी लोकायुक्त कायदा करून त्यांची नियुक्ती करण्याची तरतूद लोकपाल कायद्यात आहे. असे असताना अनेक राज्यांत हा कायदाच नाही. महाराष्ट्रात भाजप सरकारला चार वर्षांचा कालावधी उलटूनही लोकायुक्त कायदा व त्यांची नेमणूक का केली नाही, अशी विचारणा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.

हजारे यांनी पत्रात म्हटले आहे, की काँग्रेस व सध्याच्या भाजपच्या केंद्रातील सरकारने लोकायुक्त नेमणुकीची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे कळविले होते. लोकायुक्त अधिनियम २०१३नुसार महाराष्ट्रात सक्षम लोकायुक्त कायदा करून त्यांची नियुक्ती करणे गरजेचे होते. मात्र, आपण चार वर्षांत त्यांची नेमणूक केली नाही. त्यामुळे ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे आंदोलन करणार असल्याचा इशारा हजारे यांनी पत्रात दिला आहे.

Web Title: Lokayukta is not appointed Anna Hazare