भाजप-सेना युती होणार? खासदारांना मातोश्रीचं बोलावणं

भाजप-सेना युती होणार? खासदारांना मातोश्रीचं बोलावणं

मुंबई- युतीचं अखेर जुळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, 'युती झाली तर त्याचा फायदा आणि नाही झाली तर त्याचा फटका हा दोनही पक्षांना होणार आहे याची जाणीव झाल्याने दोनही पक्ष वास्तवाची जाणीव ठेवून भूमिका घेतील.' अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.

अधिवेशन सुरु असतानाही शिवसेना खासदारांना मातोश्रीवरून बोलावण आले आहे. उद्या शिवसेनेच्या नेत्यांच्या मुंबईत महत्वाच्या दोन बैठका होणार आहेत. या बैठकीत शिवसेना भाजपसोबत जाणार असल्याचा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना 23 तर भाजप 25 जागांवर लढेल, हा युतीचा नवा फॉर्म्युला असेल अशीही चर्चा आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सेना 22 तर भाजप 26 जागांवर लढले होते.

राज्यात शिवसेनेची भाजपवर होणारी टीका अजुनही सुरुच आहे, त्याचबरोबर युतीसाठी आम्ही बोलत नाही असे दोनीही पक्ष दाखवत असले तरी पडद्यामागून चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, शिवसेनेने भिवंडी जागेसाठी आग्रह धरल्याचे समजते. शिवसेनेने पालघर जागा देखील मागितली होती पण भाजपने ही जागा आपल्यालाच हवी असल्याचे सांगितलं आहे. सध्या जे मतदारसंघ दोन्ही पक्षांकडे आहेत तेच मतदारसंघ कायम ठेवण्यात येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com