मुंबई - कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील जागा वाढवण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी डॉ. नीलेश राणे यांना पाठिंबा द्या, असा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसने ठेवला आहे. नारायण राणे आपलेच आहेत, असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी बुधवारी एका मेळाव्यात केले. "परत या' अशी साद स्वाभिमान पक्षाला दिली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात आघाडीला योग्य उमेदवार सापडत नसल्याने तेथे राणेंचे सुपुत्र नीलेश राणेंना पाठिंबा द्यावा, असा निरोप "राष्ट्रवादी'ने पाठवला आहे. राणे यांनी कॉंग्रेसला दगा दिल्याने त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्न उपस्थित होतोच कुठे, असा सवाल करत कॉंग्रेसने प्रथम नकार दिला; मात्र नंतर "रावेरची जागा आम्ही लढवतो, तुम्ही रत्नागिरीत काय ते करा' असा निरोप कॉंग्रेसने "राष्ट्रवादी'ला पाठवल्याचे समजते.
|