आप लढविणार राज्यात दहा जागा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

पुणे - आम आदमी पक्षाने पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘समृद्ध महाराष्ट्र आघाडी’च्या माध्यमातून राज्यातील छोट्या पक्षासोबत आघाडी करीत राज्यातील दहा जागा लढण्याची घोषणा केली आहे.

राज्यातील जनतेला भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना पर्याय देण्यासाठी ‘आप’ने पुढाकार घेत ‘समृद्ध महाराष्ट्र आघाडी’ स्थापन केली आहे. आघाडीच्या माध्यमातून ‘आप’ पुणे, मुंबई, नागपूर यांसह राज्यातील दहा जागा लढविणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे. 

देशात पहिल्यांदा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी दिल्लीतील आम आदमी पक्षाने केल्याने ‘आप’ने मंडईत साखर वाटून निर्णयाचे स्वागत केले. गेल्या तीन वर्षांतील दिल्लीच्या विकासाचा फायदा राज्यातील लोकसभा निवडणुकीत काही प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे पक्षाने दहा जागा लढण्याचा निर्णय जाहीर केल्याचे ‘आप’चे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी सांगितले.

Web Title: Loksabha Election Aap Party Politics