मुख्यमंत्रिपदाची मागणी धुडकावली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

मुंबई - युतीच्या चर्चेवरून भाजप व शिवसेनेचे शहकाटशहाचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती व्हावी यासाठी भाजप व शिवसेनेकडून ‘माइंडगेम’ सुरू आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रिपद हवे असल्याची मागणी केली आहे, तर भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला. 

गेल्या निवडणुकीत लोकसभेला युतीने लढणारे शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी वेगवेगळे लढले. भाजपचे सर्वांत जास्त आमदार निवडून आल्यानंतर मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. त्यानंतर काही दिवसांनी शिवसेना सत्तेत सामील झाला. मात्र दुय्यम वागणूक मिळाल्याची सल शिवसेनेला बोचत आहे. यामुळे शिवसेनेने वेगळे लढण्याची घोषणा केली. मात्र भाजपने युती व्हावी, अशी जाहीर भूमिका घेतली आहे.

यानंतर दररोज युतीसाठी दोन्ही बाजूंनी मागण्यांची समीकरणे मांडली जात आहेत. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यावे, अशी मागणी केली आहे. मात्र भाजपने शिवसेनेची ही मागणी धुडकावली आहे. ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री, अशी भाजपची भूमिका आहे.

याबाबत भाजपचे प्रवक्‍त माधव भांडारी यांनी बिहारमध्ये नितीशकुमार यांचे उदाहरण दिले आहे. ते म्हणाले, की बिहारमध्ये ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री या सूत्राने मुख्यमंत्री नितीशकुमार झाले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election Chief Minister Demand Shivsena BJP Politics